WhatsApp वर लवकरच येणार धमाकेदार फिचर्स, युजर्सचा चॅटिंग करण्याचा अंदाज बदलणार
जगातील सर्वात प्रसिद्धा आणि करोडोंच्या संख्येने युजर्स असलेली व्हॉट्स्ॅप (WhatsApp) कंपनी बदलत्या काळानुसार फिचर्स रोलआउट करते. त्यामुळे युजर्सला या फिचर्सच्या माध्यमातून अनेक गोष्टींची मजा घेते येते.
जगातील सर्वात प्रसिद्धा आणि करोडोंच्या संख्येने युजर्स असलेली व्हॉट्स्ॅप (WhatsApp) कंपनी बदलत्या काळानुसार फिचर्स रोलआउट करते. त्यामुळे युजर्सला या फिचर्सच्या माध्यमातून अनेक गोष्टींची मजा घेते येते. याच दरम्यान, गेल्या काही काळापासून व्हॉट्सअॅपवर काही नवे फिचर्स येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकत्याच व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंग आणि इमोजी मध्ये काही नवे अॅडिशन आणल्याचे दिसून आले आहे. तर जाणून घ्या व्हॉट्सअॅपवर कोणते नवे फिचर्स येऊ शकतात. ज्यामुळे युजर्सचा चॅटिंग करण्याचा अंदाज बदलणार आहे.(WhatsApp Useful Tips: व्हॉट्सअॅपद्वारे English मध्ये चॅट करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये करा 'या' सेटिंग्स)
फेसबुकचे मालकी हक्क असलेल्या व्हॉट्सअॅप वेब मध्ये Attachment Icon अपडेट केले आहे. कंपनीने अन्य Icon सारखेच दिसण्यासाठी अॅपमधील कॅमेरा आणि गॅलरी Icon चे कलर बदलले आहेत. त्याचसोबत व्हॉट्सअॅपने Media Guidelines नावाचे एक फिचर ही रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. या फिचरच्या माध्यमातून युजर्सला इमेज, व्हिडिओ आणि GIF एडिट करतेवेळी स्टिकर्स आणि टेक्स अलाइन करता येणार आहे.
व्हॉट्सअॅप मधील अन्य फिचर्स बद्दल सांगायचे झाल्यास, iOS अॅपमध्ये Always Mute बटन दिले जाणार आहे. याच्या माध्यमातून 8 तास, एक आठवडा किंवा कायमचे एखाद्या युजर्सला किंवा ग्रुपला Mute करता येणार आहे. तर Catlog Shortcut च्या माध्यमातून युजर्सला बिझनेस कॅटलॉगचे सहज एक्सेस दिले जाते. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपने अॅन्ड्रॉइड बिझनेस आणि iOS अॅप मध्ये हे फिचर दिले आहे. हे फिचर व्हॉट्सअॅप वेब आणि डेस्कटॉप बेस्ड अॅपसाठी सुद्धा उपलब्ध केले आहे.(WhatsApp Chats होत आहे लीक; तुमच्याबाबतही घडू शकतो हा प्रकार, 'या' सोप्या उपायांनी ठेऊ शकता व्हॉट्सअॅपवरील संवाद सुरक्षित)
अजून एक फिचर म्हणजे कंपनीने बीटा युजर्ससाठी रिडिझाइन केलेल्या Storage Usage सेक्शन रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. हे फिचर आता अॅपमुळे व्यापला जाणारा स्टोरेज कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे युजर्सला ते कोणत्या मीडिया फाइल्ससाठी किती स्टोरेज व्यापला गेला आहे किंवा त्या डिलिट करुन स्पेस वाढवता येईल हे ठरवता येणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)