Whatsapp Business Customers: व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी 'या' युजर्संला भरावे लागणार पैसे; कंपनीने दिली माहिती

कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात कोट्यावधी वापरकर्ते आहेत. सोशल मीडिया अॅप पैकी व्हॉट्सअ‍ॅप अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र, कंपनी केवळ व्हॉट्सअॅप बिझिनेस (Whatsapp Business) वापरकर्त्यांकडून शुल्क आकारणार आहे. इतर यूजर्ससाठी व्हॉट्सअॅप मोफत असणार आहे.

WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

Whatsapp Business Customers: फेसबुकचा मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी वापरकर्त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात कोट्यावधी वापरकर्ते आहेत. सोशल मीडिया अॅप पैकी व्हॉट्सअ‍ॅप अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र, कंपनी केवळ व्हॉट्सअॅप बिझिनेस (Whatsapp Business) वापरकर्त्यांकडून शुल्क आकारणार आहे. इतर यूजर्ससाठी व्हॉट्सअॅप मोफत असणार आहे.

तुम्हीही व्हॉट्सअ‍प बिझिनेस वापरकर्ते असल्यास, लवकरचं आपल्याला त्यातील काही सेवांसाठी पैसे द्यावे मोजावे लागणार आहेत. व्हॉट्सअ‍प बिझिनेसकडून जगभरातील वापकर्त्यांना pay-to-message हा पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायावर जाऊन वापरकर्त्यांना शुल्क भरावे लागणार आहे. व्हॉट्सअ‍पने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आम्ही आमच्या व्यावसायिक ग्राहकांना काही सेवांसाठी शुल्क आकारणार आहोत." परंतु, अद्याप व्यवसायिक सेवांसाठी कंपनीने किंमतींचा तपशील शेअर केलेला नाही. (हेही वाचा - WhatsApp च्या माध्यमातून आता युजर्सला करता येणार शॉपिंग, कंपनी लवकरच घेऊन येणार नवे फिचर)

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपने म्हटलं आहे की, अशा प्रकारे व्यवसाय वापरकर्त्यांकडून शुल्क आकारून, अॅप आपला स्वतःचा व्यवसाय तयार करण्यास सक्षम असेल आणि वापरकर्त्यांना विनामूल्य एंड-टू-एंड एनक्रिप्टेड मजकूर, व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलिंग सेवा देत राहील. गुरुवारी, व्यासपीठाने त्याचे एपीआय आणि सॉफ्टवेअर इंटरफेस वापरुन व्यवसायांना अपडेट केले आहे. ज्यामुळे कंपन्या अॅपच्या बाहेरही थर्ड पार्टी डॅशबोर्डवर आपल्या ग्राहकांच्या मेसेज थ्रेड्स व्यवस्थापित करू शकतात.

मेसेजिंग प्लॅटफॉर्म त्याच्या व्यवसाय सेवेवर काही ग्राहकांकडून थोडे शुल्क आकारत आहे. सामान्य वापरकर्त्यांसाठी, अॅपमध्ये देयकाशी संबंधित कोणताही बदल होणार नाही आणि ते पूर्वीसारखेचं संदेश करण्यास सक्षम असतील. परंतु, व्हॉट्सअॅप येत्या काही काळात अ‍ॅपवर जाहिराती दाखवू शकेल. कंपनी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून यावर काम करत आहे. अ‍ॅपच्या Status सेक्शनमध्ये वापरकर्त्यांना जाहिराती दर्शविल्या जाऊ शकतात.