नवा स्मार्टफोन खरेदी करायचा विचार? तर 12 हजारांहून कमी किंमती मधील 'या' दमदार फोनबद्दल जरुर जाणून घ्या

OnePlus Nord Smartphone Launched In India (Photo Credits: OnePlus India)

जर तुम्ही एखादा नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल. पण तुमचे बजेट कमी आहे अशा वेळी चिंता करु नका. कारण बाजारात विविध कंपन्यांचे असे काही स्मार्टफोन उपलब्ध आहेत जे तुमच्या शिखाला आणि बजेटला सुद्धा परवडतील. याच संदर्भातील आजचा लेख असून बाजारात सध्या 12 हजारांहून कमी किंमती मधील असे कोणते दमदार स्मार्टफोन आहेत त्याबद्दल अधिक माहिती देणार आहोत.(Redmi Note 9 व्हेरिएंट आता नवीन कलरमध्ये उपलब्ध; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स)

OPPO A15 या स्मार्टफोनची किंमत 9990 रुपये आहे. या स्मार्टफोनसाठी 6.52 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. तसेच ऑक्टा कोर MediaTek Helio P35 प्रोसेसरवर ही दिला आहे. या फोनसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला असून ज्यामध्ये 13MP चा प्रायमरी सेंसर, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेंसर मिळणार आहे. त्याचसोबत फोनच्या फ्रंटला 5MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. अन्य फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने Oppo A15 मध्ये 4320mAh ची बॅटरी दिली आहे. जी 10W फास्ट चार्जिंग लेस आहे.

Redmi Note 9 स्मार्टफोनसाठी 6.53 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला गेला आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर आणि 5020mAh ची बॅटरी दिली आहे. या व्यतिरिक्त या फोनच्या रियर पॅनलवर चार कॅमेरे तर फ्रंटला एक कॅमेरा दिला गेला आहे. पॅनलसाठी 48MP लेन्स, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP मायक्रो सेंसर आणि 2MP चा डेप्थ सेंसर दिला आहे. याची किंमत 10,999 रुपये (4GB+64GB) आहे.

तसेच Vivo Y20i कंपनीच्या या स्मार्टफोनची किंमत 11,490 रुपये आहे. यामध्ये 6.51 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रेजॉल्यूशन 720X1600 पिक्सल आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये 13MP+2MP+2MP कॅमेरा सेटअप , 8MP सेल्फी कॅमेरा, Snapdragon 460 प्रोसेसर आणि 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.(Micromax In Note 1 आणि Micromax In 1b स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक)

Samsung Galaxy M11 स्मार्टफोनची किंमत 11,499 रुपये आहे. यामध्ये 6.4 इंचाचा HD+Infinity-O डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर दिला आहे. या व्यतिरिक्त फोनसाठ 5000mAh ची दमदार बॅटरी सपोर्ट ही मिळणार आहे. जी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. अन्य स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने Galaxy M11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा पहिला 13MP चा प्रायमरी सेंसर, दुसरा 5MP चा अल्ट्रा वाइड अँगल आणि तिसरा 2MP चा डेप्थ सेंसर दिला आहे. तर फोनच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे.