Surya Grahan 2019 Safety Tips: कंकणाकृती सूर्यग्रहण सुरक्षितपणे पाहण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी
हे सूर्यग्रहण भारतामधून दिसणार असल्याने खगोलप्रेमींमध्ये या दिवसाचं विशेष आकर्षण आहे. कंकणाकृती ग्रहणात चंद्राच्या सरळ छायेखाली असलेल्या प्रदेशात 'सूर्याची कंकणाकृती' स्थिती पाहता येते.
2019 सालामधील शेवटचं सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse) यंदा 26 डिसेंबरला पाहता येणार आहे. हे सूर्यग्रहण भारतामधून दिसणार असल्याने खगोलप्रेमींमध्ये या दिवसाचं विशेष आकर्षण आहे. कंकणाकृती ग्रहणात चंद्राच्या सरळ छायेखाली असलेल्या प्रदेशात 'सूर्याची कंकणाकृती' स्थिती पाहता येते. तर त्याच्या आजुबाजूच्या भागामध्ये खंडग्रास ग्रहण पाहायला मिळतं. उद्या भारतामध्येही दक्षिण भारतामध्ये कोइम्बतूर,धरपूरम, दिंडीगुल, एरोडे, कान्हनगड , कन्नूर, करूर, कोझीकोडे, मदेकेरी, मंगलोर, मंजेरी, उटी,फाल्लकड, पायन्नूर,पोलची,पुडुकोटल,तिरूचीपल्ली,तिरूर येथे सुमारे 2-3 मिनिटं कंकणाकृती सूर्यग्रहणाचा अनुभव घेता येणार आहे तर उर्वरित भागात खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. Surya Grahan 2019 Sutak Time: 26 डिसेंबर दिवशी दिसणार्या सूर्यग्रहणाचा सुतक काळ, ग्रहण काळ काय?
दरम्यान सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लूटायचा असेल तर त्याची सोय ऑनलाईन माध्यमातून करण्यात आलं आहे. मात्र तुम्ही हे सूर्यग्रहण थेट डोळ्यांनीही पाहू शकता. परंतू त्यासाठी काही नियम पाळणं गरजेचे आहे. अन्यथा आरोग्यावर परिणाम होण्यासोबतच डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. Surya Grahan Dec 2019 Live Streaming: 26 डिसेंबरचं कंकणाकृती सूर्यग्रहण ऑनलाईन कसं आणि कुठे पहाल?
थेट सूर्यग्रहणा पाहताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?
- भारतामधून उद्या काही ठिकाणी कंकणाकृती तर काही ठिकाणी खंडग्रास ग्रहण पाहता येणार आहे. हे ग्रहण थेट डोळ्यांनी पाहणं टाळणंच हितावह आहे. थेट सूर्यग्रहण पाहिल्यास डोळ्यांच्या रेटिनाचं नुकसान होऊ शकतं.
- 'सोलार एक्लिप्स गॉगल' यांचा वापर करूनच सूर्यग्रहण पहावं. सनग्लास किंवा सामान्य गॉगल लावून सूर्यग्रहण पाहू नका. तसेच 'सोलार एक्लिप्स गॉगल' हटवल्याशिवाय सूर्याकडून नजर हटवू नका.
- सूर्यग्रहणाच्या काळात मोबाईल फोन किंवा सामान्य कॅमेर्यामधून छायाचित्र टिपणं टाळा.
- सोलार फिल्टर टेलिस्कोपच्या माध्यमातूनच ग्रहण पहावे किंवा फोटोग्राफी करावी.
मुंबईमध्ये ग्रहण सकाळी 8 वाजून 4 मिनिटांनी सुरू होईल आणि 10 वाजून 55 मिनिटांनी संपणार आहे. या काळात अनेक ठिकाणी सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून सूर्यग्रहण पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.