चंद्र 50 मीटरने आकुंचित; नासा संशोधकांकडून Moonquakes मुळे बदल होत असल्याचा दावा (Watch Video)
याची तीव्रता 2-5 रिश्टर स्केल इतकी होती.
नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वीचे नुकसान होत आहे. पण आता चंद्राचंदेखील नुकसान होत असून तो 50 मीटर आकुंचित झाल्याचा दावा नासाच्या शास्त्रज्ञांनी Nature Geosciences मध्ये केला आहे. पृथ्वीवर जसे भूकंप होतात तसे चंद्रावर चंद्रकंप (Moonquakes ) होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. परिणामी पृष्ठभूमी थंड असल्याने तो आकुंचित होत आहे. Chandrayan 2: 9-16 जुलै दरम्यान होणार 'चांद्रयान 2' चं प्रक्षेपण, ISRO ची माहिती
नासाने शेअर केला खास व्हिडिओ
अपोलो मोहिम
अपोलो 11 च्या मोहिमेनुसार, चंद्रावर सेस्मोमीटरच्या माध्यमातून काही घडामोडींचा वेध घेता येतो. काही उपकरणांच्या माहितीनुसार, 1969 ते 77 या काळात चंद्रावर 28 सौम्य चंद्रकंप आले. याची तीव्रता 2-5 रिश्टर स्केल इतकी होती.
चंद्राची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा त्याचा व्यास 3 हजार 476 किलोमीटर होता. काळानुसार जसे बदल होत आहेत तसा चंद्रामध्येही बदल झाला आहे. आता आकुंचन पावल्याने चंद्रावरील पृष्ठभूमी फाटल्यासारखी दिसत आहे.