Christmas Star: या महिन्यात तब्बल 800 वर्षानंतर आकाशात दिसणार मोठी खगोलशास्त्रीय घटना; दर्शन होणार 'ख्रिसमस स्टार'चे, जाणून घ्या सविस्तर  

यंदा ख्रिसमसच्या अगोदर आकाशात एक अद्भुत खगोलीय घटना घडणार आहे. ही घटना गेल्या आठशे वर्षांमध्ये घडली नव्हती.

Jupiter and Saturn (Photo Credits: Pixabay)

आनंदाचा उत्सव ख्रिसमस (Christmas) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा ख्रिसमसच्या अगोदर आकाशात एक अद्भुत खगोलीय घटना (Astronomical Event) घडणार आहे. ही घटना गेल्या आठशे वर्षांमध्ये घडली नव्हती. ख्रिसमसच्या काही दिवस आधी, 21 डिसेंबरला आकाशात ‘ख्रिसमस स्टार’ (Christmas Star) दिसणार आहे. या दिवशी, बृहस्पति (Jupiter) व शनि (Saturn) आकाशात सरळ रेषेत येतील, या घटनेला ख्रिसमस स्टार किंवा बेथलेहेमचा तारा म्हणतात. 21 रोजी, सोलर सिस्टीमचे दोन मोठे ग्रह, शनि आणि बृहस्पति सुमारे 800 वर्षांनंतर एकमेकांच्या अगदी जवळ असतील. अंतराळवीर या खगोलशास्त्रीय घटनेला ग्रेट कजंक्शन असे म्हणतात.

मध्ययुगीन काळानंतर बृहस्पति आणि शनि दोघेही पृथ्वीच्या अगदी जवळ आले नाहीत. राईस युनिव्हर्सिटीचे खगोलशास्त्रज्ञ पॅट्रिक हर्टिगन यांनी फोर्ब्स मासिकाला सांगितले की, 20 वर्षानंतर बृहस्पति आणि शनि नेहमीच सरळ रेषेत येतात, परंतु या वेळेचा संगम एक दुर्मिळ घटना आहे. कारण हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत व मानव ही घटना पाहू शकतील. 21 डिसेंबर ही वर्षाची सर्वात मोठी रात्र आहे यासह, यावेळी विंटर सॉलिस्टीस (Winter Solstice) सुरू होते. या वेळी या ग्रहांमधील अंतर केवळ 0.1 डिग्री असेल. सुमारे 800 वर्षांनंतर हे घडत आहे.

यापूर्वी 1226 मध्ये हे दोन ग्रह इतके जवळ आले. 2020 नंतर, 15 मार्च 2080 च्या रात्री बृहस्पति -शनि इतक्या जवळ दिसतील. या घटनेनंतर लगेचच नातळचा उत्सव साजरा होणार आहे म्हणूनच याला 'ख्रिसमस स्टार' असे म्हणतात. (हेही वाचा: Moon Mission For Woman: जेफ बेझोस यांची कंपनी Blue Origin चंद्रावर पाठवणार पहिली महिला)

बृहस्पति हा सौर मंडळाचा पाचवा ग्रह आहे आणि शनि हा सहावा ग्रह आहे. बृहस्पति 11.86 वर्षात सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. तर शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 29.5 वर्षे लागतात. प्रत्येक वेळी 19.6 वर्षांत हे दोन ग्रह एकमेकांच्या जवळ येतात, जे सहज आकाशात दिसू शकतात. या घटनेला 'ग्रेट कंजेक्शन' असे म्हणतात. शेवटचे कंजेक्शन 2000 मध्ये झाले होते. पुढील कंजेक्शन 5 नोव्हेंबर 2040 रोजी होईल. यानंतर, पुढील ग्रेट कंजेक्शन 15 मार्च 2080 रोजी  दिसेल.

शनि आणि बृहस्पति एकमेकांपासून 400 मैल अंतरावर आहेत, परंतु ते एकमेकांच्या जवळ आल्याने आकाशात एक प्रकाशबिंदू निर्माण होईल, ज्यामुळे ही घटना पृथ्वीवरून देखील दिसू शकेल.