Chandrayaan-2 Launch Live News Updates: चांद्रयान-2 ची अवकाशात यशस्वी झेप, इस्रोमध्ये आनंदोत्सवाला सुरुवात

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो (Indian Space Research Organisation) च्या बहुचर्चित चांद्रयान 2 (Chandrayaan 2) च्या मोहिमेचा काउंटडाऊन सुरु झाला आहे.

22 Jul, 21:33 (IST)

श्रीहरिकोटा येथून झेपावलेल्या चांद्रयान-2 ची मोहीम यशस्वी पार पडल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी इस्रोसह वैज्ञानिकांचे आभार मानले आहेत. तसेच भारतासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे ही कोविंद यांनी म्हटले आहे.

 

22 Jul, 21:24 (IST)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चांद्रयान-2 च्या यशस्वी मोहीमेसाठी इस्रो आणि वैज्ञानिकांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.

22 Jul, 21:12 (IST)

-केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इस्रोने पार पाडलेल्या चांद्रयान-2 च्या यशस्वी मोहीमेसाठी कौतुक केले आहे. चांद्रयानाच्या प्रक्षेपणाने भारताच्या आंतराळाच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला आहे. तसेच  आपल्या शास्त्रज्ञ आणि टीम इस्रोबद्दल राष्ट्रांवर अत्यंत गर्व आहे अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

22 Jul, 21:08 (IST)

-चांद्रयान-2 ने अवकाशात यशस्वी झेप घेतल्यानंतर आता सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच बॉलिवूडमधील कलाकार अक्षय कुमार, रविना तंडन, आर. माधवन आणि विवेक ओबेरॉय यांनी चांद्रयान मोहीमेसाठी इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत.

22 Jul, 20:58 (IST)

चांद्रयान-2 ची यशस्वी मोहीम पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या कामगिरीबद्दव आनंद व्यक्त केला आहे. चंद्रयान-2 साठी केलेल्या प्रयत्नांमुळे आपल्या युवकांना विज्ञान, उच्च दर्जाचे संशोधन आणि नव्या कल्पना उदयास आणण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

22 Jul, 20:53 (IST)

-राज्यसभा आणि लोकसभेत चांद्रयान-2 च्या यशस्वी मोहीमबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच इस्रोच्या सर्व वैज्ञानिकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. 

22 Jul, 20:49 (IST)

सुषमा स्वराज यांनी चांद्रयान-2 ची मोहीम यशस्वी झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. तसेच इस्रोच्या वैज्ञानिकांचे या मोहीमेसाठी कौतुक केले आहे.

22 Jul, 20:40 (IST)

-चांद्रयान-2 ची मोहीम यशस्वी झाल्याने इस्रो येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.

-तर वैज्ञानिकांची नजर अद्याप चांद्रयान-2 च्या प्रेक्षेपणाकडे लागले आहे.

-आर. के. हांडा यांच्या नेतृत्वाखाली 125 वैज्ञानिकांच्या टीमने केली चांद्रयान-2 ची कामगिरी

22 Jul, 20:16 (IST)

श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-2 ची अवकाशात झेपावले आहे. या ऐतिहासिक क्षणाची उत्सुकता भारतीयांमध्ये पाहायला मिळत आहे. 

22 Jul, 20:02 (IST)

चांद्रयान 2 चं प्रक्षेपण थोड्याचं वेळात होणार.  श्रीहरीकोटाहून  2.43 मिनिटांनी अवकाशात झेपावणार. भारतीयांच्या आशा उंचावल्या आहेत. इस्त्रोच्या या महत्त्वाकांक्षी यानाचे प्रक्षेपण इस्त्रोच्या फेसबूक आणि ट्विटर पेजवर पाहता येणार आहे.   यानामध्ये इंधन भरण्याचं काम आता पूर्ण झालं आहे.

22 Jul, 19:07 (IST)

चांद्रयान-2 ची मोहीम यशस्वी होण्यासाठी कानपूर येथील मंदिरात सकाळपासून प्रार्थना केली जात आहे.  तसेच आजपासून हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण सुरु झाला असून त्याचे औचित्य साधत लोकांकडून या यशस्वी मोहीमेसाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. 

22 Jul, 18:51 (IST)

-Geosynchronous Satellite Launch Vehicle Mark III याचे प्रक्षेपण पाहण्यासाठी तब्बल 7,500 लोकांनी इस्रोमार्फत ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन केले आहे.

-दुपारी 2.43 मिनिटांनी आज चांद्रयान-2 मोहिम पार पाडली जाणार आहे. 

-चांद्रमोहिम दुपारपासून टेलिव्हिजनवर दूरदर्शनसह इस्रोच्या फेसबुक आणि ट्वीटर अकाउंटच्या माध्यमातून लाईव्ह पाहता येणार आहे. 


भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो  (Indian Space Research Organisation) च्या बहुचर्चित चांद्रयान 2 (Chandrayaan 2) च्या मोहिमेचा काउंटडाऊन सुरु झाला आहे. तर आज दुपारी 2.43 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून भारताचे चंद्रयान अवकाशात सोडण्यात येणार आहे. तर तब्बल 10 वर्षानंतर दुसऱ्या चंद्रयानची मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्वांकडून प्रार्थना करण्यात येत आहे. त्याचसोबत चंद्रयान 2 ची मोहिम यशस्वी झाल्यास चंद्रावर 'Soft Landing' करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरु शकणार आहे.

चांद्रयान-2  ची मोहिम 15 जुलै रोजी पार पडणार होती. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे चंद्रयान अवकाशात उड्डाण घेण्याच्या एकातासापूर्वी ते रद्द करण्यात आले. परंतु आज (22 जुलै) रोजी चांद्रयान-2 ची मोहिम पार पडणार असून याकडे अवघ्या भारताचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच चंद्रयानाचे लँडर चंद्रावर उतरताच पहिल्या 15 मिनिटात तेथील पहिली झलक पाहता येईल असा विश्वास आहे, मात्र चंद्रावर लँडर उतरल्यापासून त्यातील रोव्हर बाहेर येण्यासाठी चार तासांचा अवधी लागणार आहे. या चांद्रयानात विविध प्रयोगांसाठी लागणारी 13 वैज्ञानिक उपकरणे असणार आहेत. चंद्रावरील खडकांचे फोटो घेऊन नंतर त्यात कॅल्शियम, मँग्नेशियम व लोह यांसारख्या धातूंचा अंश तपासला जाईल.(Chandrayaan 2 Launch Live Streaming: ऑनलाईन आणि टेलिव्हिजन वर कधी आणि कुठे पहाल ISRO च्या चंद्रमोहिमेचं लाईव्ह लॉन्चिग)

1- ऑर्बिटर

वजन- 3500 किलो

लांबी- 2.5 मीटर

2- लॅंडर

नाव - विक्रम

वजन- 1400 किलो

लांबी- 3.5 मीटर

3- रोवर

नाव- प्रज्ञान

वजन- 27 किलो

लांबी- 1 मीटर

चंद्राच्या दक्षिण धुव्राच्या आसपासच्या भागावर अद्याप कोणतेच संशोधन करण्यात आलेले नाही. त्यामुळे चंद्रयान 2 लॉन्च झाल्यानंतर यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेमध्ये पोहचणार आहे. त्यानंतर लॅंडर आणि ऑर्बिटर वेगळे होतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now