Asteroid 22 RQ, Headed Towards Earth today: अवकाशातून येणारा विमानाच्या आकाराचा लघुग्रह पथ्वीवर आदळणार? काय आहे नासाची माहिती? घ्या जाणून

आज 13 सप्टेंबर 2022 रोजी पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हा लघुग्रह, 22 RQ असून आगोदरपासूनच पृथ्वीच्या मार्गावर आहे. तो 49,536 किमीच्या आश्चर्यकारक वेगाने प्रवास करत आहे. लघुग्रह 22RQ अन्य ग्रहांवरून जाईल किंवा कोणत्याही अडथळ्यांशिवाय पृथ्वीच्या जवळून जाईल याबातब अनेकांना उत्सुकता आहे. आपणातही अशीच उत्सुकता असेल तर आपण खालील माहिती वाचू शकता.

Asteroid Representative Image (Photo Credits: Flickr)

नॅशनल एरोनॉटिक्स ॲंड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन(NASA) ने म्हटले आहे की, आहे की एक महाकाय लघुग्रह, अंदाजे एका विमानाच्या आकाराचा, आज 13 सप्टेंबर 2022 रोजी पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हा लघुग्रह, 22 RQ असून आगोदरपासूनच पृथ्वीच्या मार्गावर आहे. तो 49,536 किमीच्या आश्चर्यकारक वेगाने प्रवास करत आहे. लघुग्रह 22RQ अन्य ग्रहांवरून जाईल किंवा कोणत्याही अडथळ्यांशिवाय पृथ्वीच्या जवळून जाईल याबातब अनेकांना उत्सुकता आहे. आपणातही अशीच उत्सुकता असेल तर आपण खालील माहिती वाचू शकता.

नासाने म्हटले आहे की लघुग्रह 22 आरक्यू (Asteroid 22 RQ) पृथ्वीच्या सर्वात जवळ 3.7 दशलक्ष किमी अंतरावरुन जाईल. मात्र त्याची पृथ्वीशी धडकण्याची शक्यता फारच कमी आहे. नासाच्या ग्रह संरक्षण समन्वय कार्यालय (Planetary Defense Coordination Office) ऑफिसने इशारा दिला आहे की, 22 आरक्यू लघुग्रह 84 फूट रुंद आणि विमानाच्या आकाराचा आहे. the-sky.org च्या वृत्तानुसार, लघुग्रह 22 RQ प्रथम 1 सप्टेंबर 2022 रोजी शोधला गेला. तो लघुग्रहांच्या मुख्य अपोलो गटाशी संबंधित आहे. (हेही वाचा, Geomagnetic Storm Hits Earth: पृथ्वीवर आदळू शकते भूचुंबकीय वादळ; जाणून घ्या काय आहे जिओमॅग्नेटिक स्टॉर्म आणि त्याचे परिणाम)

लघुग्रहांचा मागोवा घेण्यासाठी, NASA कडे NEO निरीक्षण कार्यक्रम देखील आहे, जो केवळ त्यांचा मागोवा घेण्यास मदत करत नाही तर सुमारे 90% NEO (पृथ्वीजवळच्या वस्तू) रेकॉर्ड, मॉनिटर आणि वैशिष्ट्यीकृत करतो, जे त्यापेक्षा सुमारे 140 मीटर मोठे आहेत. निअर-अर्थ ऑब्जेक्ट्स (NEO) हे विविध प्रकारचे लघुग्रह, उल्का आणि धूमकेतू यांचे सामान्य नाव आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या माहितीनुसार, छोटा लघुग्रह महिन्यातून अनेक वेळा पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधून जाताना दिसतो.

दरम्यान, उल्का, लघुग्रहांचे तुकडे आणि धूमकेतू, जे बहुतेक वेळा 3 फुटांपेक्षा लहान नसतात. ते पृथ्वीच्या वातावरणात आदळू शकतात आणि त्यात स्फोट होऊ शकतात. हे जवळपास नियमीत घडते. नासाने गेल्या वर्षी DART (डबल अॅस्टरॉइड रीडायरेक्शन टेस्ट) कार्यक्रमही सुरू केला. हा कार्यक्रम पृथ्वीच्या जवळच्या वस्तूंपासून ग्रहांचे संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now