Samsung Galaxy Tab A7 Launched: सॅमसंग ने भारतात लाँच केला ‘गॅलेक्सी टॅब ए7’; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

या टॅबमध्ये 3 जीबी आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. ग्राहकांसाठी गॅलेक्सी टॅब ए7 डार्क ग्रे, सिल्वर आणि गोल्ड रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. या टॅबच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. याशिवाय एलटीई आणि वाय-फाय मॉडेलची किंमत 21,999 रुपये इतकी आहे. तुम्हाला हा टॅब खरेदी करायचा असेल तर, तुम्ही आजपासून बुंकिंग करू शकता. गॅलेक्सी टॅब ए7 मध्ये ग्राहकांना मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येणं शक्य होणार आहे.

Samsung Galaxy Tab A7 Launched (Photo Credit - Twitter)

Samsung Galaxy Tab A7 Launched: लोकप्रिय दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने भारतात गॅलेक्सी टॅब ए7 (Samsung Galaxy Tab A7) लाँच केले आहे. या टॅबमध्ये 3 जीबी आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. ग्राहकांसाठी गॅलेक्सी टॅब ए7 डार्क ग्रे, सिल्वर आणि गोल्ड रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. या टॅबच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. याशिवाय एलटीई आणि वाय-फाय मॉडेलची किंमत 21,999 रुपये इतकी आहे. तुम्हाला हा टॅब खरेदी करायचा असेल तर, तुम्ही आजपासून बुंकिंग करू शकता. गॅलेक्सी टॅब ए7 मध्ये ग्राहकांना मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येणं शक्य होणार आहे. गॅलेक्सी टॅब ए7 च्या खरेदीवर सॅमसंगने ग्राहकांना काही खास ऑफर्सदेखील दिल्या आहेत. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून, प्रमुख रिटेल स्टोर्स किंवा ई-कॉमर्स वेबसाईटवरून हा टॅब खरेदी करू शकता. (हेही वाचा -  Amazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर)

दरम्यान, गॅलेक्सी टॅब ए7 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच या टॅबमध्ये 7040 एमएएची दमदार बॅटरी देण्यात आली असून 10 इंच WUXGA+ टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय गॅलेक्सी टॅब ए7 मध्ये फोटोग्राफासाठी रिअरला 8 मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. (हेही वाचा - Realme 7 Pro चा आज Flipkart आणि Realme.com वर दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन सेल; इथे जाणून घ्या धमाकेदार ऑफर्स, किंमत, फीचर्स)

सॅमसंगने गॅलेक्सी टॅब ए7 च्या खरेदीवर खास ऑफर्स दिल्या आहेत. ग्राहक या टॅबच्या बुकिंगवर 4499 रुपयांचे कीबोर्ड कव्हर फक्त 1875 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवीन फीचर्ससह स्मार्टफोन, टॅब किंवा इतर इलेक्ट्रानिक वस्तू लाँच करत असते. याशिवाय सॅमसंगच्या खास ऑफर्समुळे ग्राहकांची मोठी बचत होते.