लोकप्रिय Google डूडल गेम 'स्कोविल' Popular Google Doodle Games सीरीजमधला 6 वा खेळ!

2016 साली शास्त्रज्ञ विल्बर स्कोविल (Wilbur Scoville) यांना 151 व्या जन्मदिनी मानवंदना म्हणून हे गूगल डुडल बनवण्यात आलं होतं. आज पुन्हा 'स्कोविल' गेममधून युजर्सना त्यांच्या योगदानाची माहिती मिळणार आहे.

Popular Google Doodle Games | Photo Credits: Google

कोरोना व्हायरसच्या संकटाशी आजही जगातील अनेक देश सामना करत आगे. यामध्ये लॉकडाऊनचा काळ लोकांसाठी थोडा इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न गूगल कडून करण्यात आला आहे. यामध्ये आज लोकप्रिय Google डूडल गेम सीरीजमध्ये सहावा गेम 'स्कोविल' (Scoville)  लॉन्च करण्यात आला आहे. कोडिंग, क्रिकेट, फ़िशिंगर, रॉकमोर आणि गार्डन नोम नंतर आता युजर्सना 'स्कोविल' खेळता येणार आहे. 2016 साली शास्त्रज्ञ विल्बर स्कोविल (Wilbur Scoville) यांना 151 व्या जन्मदिनी मानवंदना म्हणून हे गूगल डुडल बनवण्यात आलं होतं. आज पुन्हा 'स्कोविल' गेममधून युजर्सना त्यांच्या योगदानाची माहिती मिळणार आहे.

गूगलच्या स्पेलिंगमधील o या अक्षराला सोफ्यावर बसल्याच्या स्थितीत दाखवत त्याच्यासमोर लाल मिरची ठेवली आहे. गूगलच्या पुढे हिरव्या रंगाचं प्ले बटन ठेवलं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर गेम सुरू होतो. नवीन विंडोमध्ये तुम्हांला विल्बर स्कोविल एका हातात पुस्तक आणि एका हातात मिरची घेऊन पहायला मिळतील. यामध्ये वेगवेगळ्या मिरच्या चाखून त्याची माहिती मिळते. त्याच्या तिखटपण कमी करण्यासाठी आईस्क्रिम दिलं आहे. त्याचा प्रत्येक स्क्रुप मारून मिरचीचा तिखटपणा कमी करायचा आहे. जर तुम्ही ते करू शकलात तर तुम्ही जिंकलात. केवळ Google 3D Animals नव्हे तर Bolo App ते YouTube वरील DIY #WithMe... बच्चेकंपनीचा लॉकडाऊनचा काळ सत्कारणी लागेल 'या' Google Apps Features सोबत!

दरम्यान विल्बर स्कोविल यांनी कोलंबस अमेरिकेत पोहचण्यापूर्वीच मिरचीचं तिखटपण मोजण्यासाठी विशेष काम केलं होतं. तिखटपणामुळे जीभेची होणारी जळजळ आणि डोळ्यांतून पाणी येण्याच्या क्रियेवर त्यांनी विशेष संशोधन केलं होतं. 22 जानेवारी 1865 साली त्यांचा जन्म झाला असून ते केमिस्ट, पुरस्कार विजेते संशोधक आणि pharmacology चे प्रोफेसर होते. American Pharmaceutical Association चे दुसरे व्हाईस चेअरमनदेखील होते.

कोरोना व्हायरसच्या 'वॉर व्हर्सेस व्हायरस'मध्ये गूगलही आपला खारीचा वाटा उचलत आहे. जगभरात लोकांमध्ये कोरोना व्हायरस  संकटाबाबत जागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न  करत आहे. काही दिवसांपूर्वी गूगल डूडलने 'कोविड योद्धांना' सलाम करण्यासाठी खास डुडल सीरीज केली होती. आता हे इंटरॅक्टिव्ह गेम्सच्या माध्यमातून लॉकडाऊनमधील वेळात काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात 35  लाखाहून अधिक रूग़्ण आहेत तर 2 लाख 48 हजारांपेक्षा अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अमेरिका, स्पेन, इटली सह जगभरात सध्या कोरोना व्हायरस थैमान घालत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now