Oppo आणि Nokia ने एकमेकांच्या विरोधात दाखल केला खटला, जाणून घ्या यामागील कारण

स्मार्टफोन कंपन्या सध्या 5G टेक्नॉलॉजीवर अधिक भर देण्याच्या दिशेने काम करत आहेत. हेच कारण आहे की. 5जी टेक्नॉलॉजीला आपले नाव देण्यासाठी आता चढाओढ सुरु झाली आहे. दिग्गज कंपन्या सुद्धा 5जी च्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खुप पैसा घालवत आहेत

5G Mobile Network | (Photo courtesy: archived, edited, representative image)

स्मार्टफोन कंपन्या सध्या 5G टेक्नॉलॉजीवर अधिक भर देण्याच्या दिशेने काम करत आहेत. हेच कारण आहे की. 5जी टेक्नॉलॉजीला आपले नाव देण्यासाठी आता चढाओढ सुरु झाली आहे. दिग्गज कंपन्या सुद्धा 5जी च्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खुप पैसा घालवत आहेत. तर काही कंपन्या दुसऱ्यांची टेक्नॉलॉजी कॉपी करुन आपल्या प्रोडक्टला नाव देत आहेत. याच कारणावरुन आता Oppo आणि Nokia मध्ये वाद निर्माण झाले आहेत.(WhatsApp Update: 1 नोव्हेंबर 2021 पासून 'या' Android आणि iOS Smartphones मध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट होणार बंद; इथे पहा संपूर्ण यादी)

स्मार्टफोन कंपनी ओप्पोने चीन आणि युरोप मध्ये Finnish टेलिकम्युनिकेशन कंपनी Nokia च्या विरोधात काही 5जी पेटेंटचे उल्लंघन केल्याच्या संदर्भात खटले दाखल केले आहेत. यापूर्वी नोकिया कडून सुद्धा 5जी पेटेंटचे उल्लंघन केल्याप्रकरणी ओप्पोच्या विरोधात खटला दाखल केला आहे. यामध्ये स्टँडर्ड इसेंशियल पेटेंट (SEP) आणि नॉन-एसइपीचा समावेश होता.

स्मार्टफोन ब्रँन्ड ओप्पो आणि नोकियाने 2018 मध्ये काही वर्षांसाठी करार केला होता. त्यानुसार दोन्ही कंपन्या एकत्रितपणे 5जी टेक्नॉलॉजी आणि त्यासंबंधित प्रोडक्टवर काम करत होती. मात्र आता अशी बाब समोर आली आहे की, हा करार संपला आहे. त्यानंतरच 5जी पेमेंट वरुन एकमेकांमध्ये वाद सुरु झाले आहेत. नोकियाकडे मोठ्या प्रमाणात 5जी पेटेंट आहे. याच वरुन कंपनीने Samsung, Apple ,LG, Lenovo आणि Balckberry सारख्या स्मार्टफोन ब्रँन्ड सोबत रॉयल्टी करारल केला आहे.(Realme 9 स्मार्टफोन सीरिजच्या लॉन्चिंगची घोषणा, जाणून घ्या संभाव्य किंमतीसह स्पेसिफिकेशन)

आकडेवारीनुसार, 2030 पर्यंत 5जी इनेबल्ड इंडस्ट्रीचा ग्लोबल जीडीपी जवळजवळ 3 ट्रिलियन डॉलरचे योगदान असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोविड19 च्या काळात सुद्धा 5जी ग्लोबली 5जी गुंतवणकीत नफा मिळाला आहे. पुढील 5 वर्षात 72 टक्के नफा होण्याची शक्यता आहे. नोकियाने साउथ कोरियाई कॅरियर LG Uplus सह नेक्स्ड जनरेशन 5जी इक्विपमेंटला इंस्टॉल करण्याचा करार केला आहे. ज्यामुळे इनडोर मध्ये 5जी दमदार कनेक्टिव्हिटी दिली जाऊ शकते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now