Google वर 'या' गोष्टी कधीच सर्च करु नका अन्यथा होईल मोठे नुकसान

त्याचसोबत विविध मुद्द्यांवरील गोष्टींची सुद्धा संपूर्ण माहिती तेथे उपलब्ध असल्याने नागरिकांकडून गुगलचा सर्वाधिक वापर केला जातो.

Google search (PC - pixabay)

गुगल सर्चच्या (Google Search) माध्यमातून आपण बहुतांश कामे अगदी सहज करु शकतो. त्याचसोबत विविध मुद्द्यांवरील गोष्टींची सुद्धा संपूर्ण माहिती तेथे उपलब्ध असल्याने नागरिकांकडून गुगलचा सर्वाधिक वापर केला जातो. मात्र सध्याच्या काळात गुगलवर बनावट बेवसाइट तयार करुन ऑनलाईन पद्धतीने नागरिकांची फसवणूक केली जात आहे. यासाठी गुगलवर काही गोष्टी सर्च न केल्यास तेच तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे ऑनलाईन फसवणूकीपासून ही आपण दूर राहू शकतो. त्याचसोबत गुगलवर डेटा चोरी केल्याचे ही प्रकार उघडकीस आले आहेत.

गुगलवर तुम्ही एखादी गोष्ट सर्च करण्यापूर्वी विचार करा. तसेच तुमची खासगी माहिती सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर देत असल्यास त्याचे पुढे परिणाम काय होतील हे सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे 'या' काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही गुगलवर सर्च करण्यापासू टाळू शकता.(Google ची 'ही' विशेष सेवा 4 दिवसानंतर होणार बंद; जाणून घ्या काय आहे कारण?)

-ऑनलाईन पद्धतीने बँक सर्च करणे

ऑनलाईन बँकिगमुळे आपले काम सोप्पे झाले आहे. त्यामुळे बँकेत प्रत्यक्षात जाऊन रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचला जात आहे. परंतु ऑनलाईन पद्धतीने बँकेचे व्यवहार हे कधीकधी तुमच्या अंगलट सुद्धा येऊ शकतात. ऑनलाईन बँकिंगचा वापर करताना काही गोष्टींबद्दल सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे. कारण ऑनलाईन पद्धतीने बँकिंगचे घोटाळे करण्यासाठी फसवणूकदारांकडून बनावट बँकेची बेवसाइट सुद्धा तयार केली जाते. त्याच्या माध्यमातून बँकेच्या व्यवहारासंबंधित घोटाळे केले जाऊ शकतात. गुगलवर नेहमी URL सर्च करावी पण बँकेचे नाव सर्च कधीच करु नये.

-ऑनलाईन पद्धतीनो औषधे सर्च करणे

बहुतांश लोक आजाराची हलकी जरी लक्षण दिसून आली की गुगलवर त्या संदर्भाती औषधे सर्च करतात. असे केल्यास एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो. नेहमी औषधांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा. औषधाबद्दल गुगलवर तुम्हाला माहिती उपलब्ध होईल पण ती सल्ल्यानुसारच घ्यावी. कारण गुगल तुम्हाला औषध सर्च करताना डॉक्टरांचा ऑप्शन दाखवत नाही. प्रत्येक औषध ही विविध आजारांवर ठरवून दिलेली असतात. पण त्यांचे सेवन कसे करावे हे तुम्हाला डॉक्टरच योग्य पद्धतीने सांगू शकतील.

-ऑनलाईन शॉपिंग

सध्याच्या काळात ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक केली जात आहे. ब्रँन्डेड वस्तूंमध्ये बनावट वस्तू देत ग्राहकांची लूट केली जाते. बहुतांश युजर्स गुगलवर कूपन सुद्धा सर्च करतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑफर दिली असल्याचे आपल्याला दिसून येते. कूपनसाठी एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितलेले असते पण त्यावेळी जर तुम्ही तुमची खासगी माहिती दिल्यास याच्या माध्यमातून तुमचे बँकचे खाते रिकामे होऊ शकते. त्यामुळे नेहमीच अधिकृत ई-कॉमर्स संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.(Facebook ने ऑस्ट्रेलिया मध्ये बंद केली न्यूज सर्व्हिस; अनेक Emergency Services Accounts देखील बंद)

त्याचसोबत बहुतांश नागरिकांकडून गुगलच्या माध्यमातून कस्टमर केअर क्रमांक सुद्धा सर्च करतात. मात्र ही बाब तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते. सायबर हल्लेखोरांकडून बनावट कस्टमर केअरची कंपनी तयार करत तुमचा मोबाईक क्रमांकासह अन्य खासगी माहिती सुद्धा तुमच्याकडून काढून घेऊ शकतात. त्यामुळे एखाद्याला आपली खासगी माहिती देण्यापूर्वी विचार करता. तसेच कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधण्यापू्र्वी त्या संबंधित अधिकृत कंपनीला भेट द्या.