Mi TV Lux Transparent Edition: शाओमी कंपनीने सादर केला 55 इंचाचा जगातील पहिला पारदर्शक टीव्ही; जाणून घ्या वैशिष्ठ्ये व किंमत

हा टीव्ही Mi TV LUX OLED Transparent Edition या नावाने चिनी बाजारात सादर केला गेला आहे.

Xiaomi transparent TV | (Photo Credits: Twitter)

शाओमी (Xiaomi) कंपनीने आपल्या 10 वर्षे पूर्ततेच्या निमित्ताने एक खास प्रकारचा ट्रान्सपरंट (Transparent TV) म्हणजेच पारदर्शक टीव्ही बाजारात आणला आहे. हा टीव्ही Mi TV LUX OLED Transparent Edition या नावाने चिनी बाजारात सादर केला गेला आहे. याची किंमत 49,999 आरएमबी (सुमारे 5.37 लाख रुपये) आहे. Mi TV LUX OLED ट्रान्सपरंट टीव्हीची अधिकृत विक्री चीनमध्ये 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल. हा जगातील पहिला पारदर्शक टीव्ही आहे, जो मोठ्या प्रमाणात तयार केला जात आहे. Mi TV LUX OLED ट्रान्सपरंट टीव्ही हा साध्या काचेसारखा आहे, जो त्याद्वारे पाहिला जाऊ शकतो. आत्तापर्यंत असे टीव्ही केवळ विज्ञान कल्पित चित्रपटांमध्ये पाहिले जात होते, ते आता सत्यात उतरले आहेत. .

Mi TV LUX OLED पारदर्शक टीव्हीमध्ये फ्यूचरिस्टिक डिझाइन दिले गेले आहे. हा 55 इंचाचा पारदर्शक OLED पॅनेल स्मार्ट टीव्ही असेल. टीव्ही 10 bits पॅनेल डिस्प्ले 1.07 अब्ज कलर कॉम्बिनेशन आणि अतिरिक्त वाइड कलर स्पेक्ट्रमसह आहे. टीव्हीच्या डिस्पेमध्ये 120Hz रिफ्रेश्ड रेट आणि 120 हर्ट्ज एमईएमसी तंत्रज्ञान देण्यात येत आहे. Mi TV LUX OLED ट्रान्सपरंट टीव्हीमध्ये AI Master Smart इंजिन आहे, जे MediaTek 9650 चिपसेटसह येईल. टीव्ही कस्टम मेड MIUI आधारित असेल. ध्वनीसाठी टीव्हीमध्ये Dolby Atmas सपोर्ट दिला गेला आहे. टीव्ही 5.7 मिमी अल्ट्रा थीन बॉडीमध्ये येईल. हा टीव्ही आयताकृती स्क्रीन आणि राउंड बेससह येईल, जो उत्कृष्ट अनुभवाची फिलिंग प्रदान करेल. (हेही वाचा: Realme C12 आणि Realme C15 स्मार्टफोन येत्या 18 ऑगस्टला होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्स)

टीव्ही ऑलव्हेज-ऑन डिस्प्लेला देखील सपोर्ट करतो, जेणेकरुन वापरकर्ते त्यांच्या इच्छेनुसार डिस्प्ले इमेज आणि टेक्स्टला आपल्याला हवे तसे सेट करू शकतील. कनेक्टिव्हिटीसाठी, Mi TV Lux Transparent Edition मध्ये ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ व्ही 5.0, तीन एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट, एक एव्ही पोर्ट आणि इथरनेट पोर्ट आहे. मेजरमेंटच्या बाबतीत बोलायचे झाले तर, बेसशिवाय 750x1227.50 मिमी आणि उंचीच्या बाबतीत हा टीव्ही 823.11 मिमी आहे. Mi TV Lux Transparent Edition चे एकूण वजन 24.96 किलो आहे व हा फक्त 5.7 मिमी जाड आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif