Instagram च्या नव्या फिचरची घोषणा; Story Posts मधील पोस्ट ऑटोमेटिकली होणार ट्रान्सलेट

या ऑप्शनद्वारे तुमच्या स्टोरी पोस्टमधील टेक्स्ट हा आपोआप ट्रान्सलेट केला जाईल. जेव्हा अॅपमध्ये एखादी परदेशी भाषा डिटेक्ट होईल तेव्हा युजरला See Translation चे बटण दिसेल.

Instagram logo (Picture Credits: instagram.com)

इंस्टाग्रामने (Instagram) आपल्या अॅपमध्ये एक नवीन ऑप्शन अॅड केले आहे. या ऑप्शनद्वारे तुमच्या स्टोरी पोस्ट (Story Posts) मधील टेक्स्ट हा आपोआप ट्रान्सलेट केला जाईल. जेव्हा अॅपमध्ये एखादी परदेशी भाषा डिटेक्ट होईल तेव्हा युजरला 'See Translation' चे बटण दिसेल. हे बटण स्क्रिनच्या टॉप लेफ्ट कॉर्नरला असेल. यावर क्लिक केल्यास तो टेक्स्ट तुमच्या भाषेत ट्रान्सलेट होऊन तुम्हाला दिसेल. हे नवे ट्रान्सलेशन फिचर जगामध्ये सगळीकडे उपलब्ध केले असून यामध्ये सध्या 90 पेक्षा अधिक भाषांचा सपोर्ट आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय युजर्सच्या पोस्ट तुम्ही सहज वाचू शकाल. अॅप रिसर्चर Alessandro Paluzzi यांनी मागे दिलेल्या रिपोर्टनुसार या फिचरचे काम इंस्टाग्राममध्ये सुरु होते.

2016 मध्ये कमेंट्स, कॅप्शन आणि युजर बायोमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्सलेशनचे फिचर इंस्टाग्रामने सुरु केले होते आणि त्याच्या एक महिन्यानंतर हे फिचर स्टोरीज मध्ये देखील अॅड करण्यात आले. हे नवे फिचर सध्या फक्त टेक्स्ट ट्रान्सलेट करु शकतो. ऑडिओ ट्रान्सलेशन अजून उपलब्ध झालेले नाही, अशी माहिती कंपनीने दिली आहे. (Instagram Reels व्हिडिओ मोबाईलमध्ये कसे Save कराल? जाणून घ्या सोप्पी ट्रिक)

फिडपोस्ट आणि रिल्ससाठी इतर युजर्ससोबत कोलॅब्रेशन करण्याचे नवीन फिचरवर इंस्टाग्राम सध्या टेस्टिंग करत आहे. या फिचरचे नाव Collab असे असेल. याचा वापर करुन तुम्ही तुमच्या फिडपोस्ट आणि रिलसाठी एका दुसऱ्या युजरला इन्वाईट करु शकाल. त्यामुळे हा कन्टेंट दोन्ही युजर्सच्या फॉलोअर्संना दिसेल. जर समोरील युजरने तुमची रिक्वेस्ट अॅस्पेट केली तर तो कन्टेंट दोघांच्या प्रोफाईलवर शेअर होईल. यासोबतच दोन्ही युजर्सच्या फॉलोअर्सच्या फिडमध्ये हा कन्टेंट दिसेल आणि दोन्ही युजर्स या कन्टेंटला दिलेला फिडबॅक पाहू शकतील.