WhatsApp Tips And Tricks: व्हॉट्सअॅपवर तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर, अशा प्रकारे करा स्वतःला अनब्लॉक; जाणून घ्या 'या' सोप्या ट्रिक

जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही मित्रांनी ब्लॉक केले असेल, तर तुम्ही स्वतःला अनब्लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स (Whatsapp Tips) फॉलो कराव्या लागतील.

WhatsApp | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

WhatsApp Tips And Tricks: इन्स्टंट मेसेजिंग व्हॉट्सअॅपवर तुम्हाला अनेक खास फीचर्सचा अॅक्सेस मिळतो. यामुळेच हे अॅप सर्व वयोगटातील लोकांची पसंती बनले आहे. लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ व्हॉट्सअॅपवर घालवतात. इथे तुम्हाला फक्त मेसेजच नाही, तर व्हिडीओ कॉलिंग, फोटो-व्हिडिओ ट्रान्सफर (Whatsapp Upcoming Features) आणि इतर अनेक सुविधा मिळतात. आजच्या व्यस्त काळात, सतत एकमेकांशी जोडलेले राहण्यासाठी व्हॉट्सअॅप हे एक उत्तम माध्यम आहे.

व्हॉट्सअॅपवर ब्लॉक फीचर (Whatsapp Block Feature) देखील देण्यात आले आहे. काहीवेळा तुमचे मित्र आणि कुटुंब तुम्हाला नाराजी व्यक्त करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर ब्लॉक करतात. जेव्हा कोणी तुम्हाला WhatsApp वर ब्लॉक करते, तेव्हा तुम्ही त्यांना मेसेज करू शकत नाही किंवा त्यांचे स्टेटस पाहू शकत नाही. अशा परिस्थितीत काही वेळा काही महत्त्वाचे काम असेल तर खूप त्रास होतो. जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही मित्रांनी ब्लॉक केले असेल, तर तुम्ही स्वतःला अनब्लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स (Whatsapp Tips) फॉलो कराव्या लागतील. चला जाणून घेऊया WhatsApp वर स्वतःला कसे अनब्लॉक करावे. (वाचा - Tata Sky बनले Tata Play, 15 वर्षांनंतर या बदलामुळे यूजर्सना मिळणार Netflix सपोर्ट)

या सोप्या ट्रीक फॉलो करा -

  • यासाठी प्रथम तुमचे व्हॉट्सअॅप खाते उघडा आणि नंतर त्याच्या सेटिंग्जमध्ये जा.
  • त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन अकाउंटवर क्लिक करा. जिथे तुम्हाला Delete My Account चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला देशाचा कोड आणि मोबाईल नंबर टाकून पुन्हा व्हॉट्सअॅप अकाउंटमध्ये लॉग इन करावे लागेल.
  • खाते लॉग इन करण्यासाठी दिलेली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचे खाते पुन्हा तयार केले जाईल.
  • त्यानंतर तुम्हाला आपोआप अनब्लॉक केले जाईल. त्यानंतर ज्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे, त्याला मेसेज किंवा व्हॉट्सअॅप कॉल करू शकाल.

मात्र, तुम्ही खाते हटविल्याशिवाय स्वतःला अनब्लॉक करू शकत नाहीत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now