Paytm आणि Google Pay च्या माध्यमातून होतेय नागरिकांची फसवणूक, तुम्ही सावधगिरी बाळगा

तर नागरिकांची फसवणूक करण्यासाठी भामट्यांकडून विविध मार्ग शोधून काढत आहेत. मात्र सध्या ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या व्यवहारांच्याबाबत फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.

Paytm and Google Pay (Photo Credits-File Image)

गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना फसवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तर नागरिकांची फसवणूक करण्यासाठी भामट्यांकडून विविध मार्ग शोधून काढत आहेत. मात्र सध्या ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या व्यवहारांच्याबाबत फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यात आता अजून एक भर पडली असून ठाणे येथील एका रहिवाशाला ऑनलाईन पद्धतीने गंडा घालत 1 लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे.

पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर असे सांगण्यात आले आहे की, एका व्यक्तीने फेसबुकवर त्यांचे फर्निचर विकण्यासाठी जाहीरात झळकवली होती. त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीचा फोन येत फर्निचर खरेदी करण्याबबात विचारले. त्यावेळी पेटीएमच्या किंवा गुगल पे च्या माध्यमातून फर्निचर खरेदीचे पैसे पाठवू असे आश्वासन दिले. पीडित व्यक्तीने याबबात अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, पेटीएम आणि गुगल पे च्या माध्यमातून तीन वेळा ट्रान्झॅक्शन झाले. पण त्यावेळी पैसे मिळाले नाही मात्र बँक खात्यामधून लाखो रुपये काढले गेले. भामट्याने पीडित व्यक्तीकडे बँकेत पैसे जमा करण्यासाठी त्याबाबत अधिक माहिती विचारली होती. मात्र अखेर व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे समजून आले. (पुणे: Paytm केवीयसी अपडेटच्या नावाखाली 15 जणांची लाखो रुपयांची फसवणूक)

तसेच पेटीएम वरील तुमच्या जुना पासवर्ड बदलून नवा ठेवावा असे आवाहन सुद्धा ग्राहकांना करण्यात आले आहे. कारण बहुतांश वेळेस ग्राहक काही कॉमन पासवर्ड ठेवतात. त्यामुळे हॅकर्सला सहज एखाद्या युजर्सचा डेटा चोरी करणे सोपे होते.

जानेवारी महिन्यापासून Windows 7 चे अपडेट मिळणे होणार बंद Watch Video

त्याचसोबत मोबाईल क्रमांकावर आलेला OTP सुद्धा एखाद्या व्यक्तीला शेअर करु नये असे ही वारंवार मेसेज द्वारे ग्राहकाला सांगितले जाते. त्यामुळे तुम्हीसुद्धा पेटीएम आणि गुगल पे च्या माध्यमातून पैशासंबंधित व्यवहार करत असाल तर आजच सावध व्हा. तसेच पोलिसांकडून आणि बँकेकडून नागरिकांना त्यांच्या बद्दल किंवा बँक खात्याबाबत माहिती देऊ नये अशी पूर्वसुचना देत असतात.