IPL Auction 2025 Live

New Year 2019 : नववर्षाच्या शुभेच्छा ऑनलाईन पाठवण्यासाठी WhatsApp New Year 2019 stickers इन्स्टॉल आणि फॉरवर्ड कशी कराल ?

व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या मदतीने नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत

New Year 2019 WhatsApp Stickers (File Photo)

Happy New Year 2019 WhatsApp Stickers: 2018 ला अलविदा म्हणत 2019 या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आपण सारेच तयार आहोत. जगभरात नव्या वर्षासाठी काऊंटडाऊन सुरू झालं आहे. मग तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी या नव्या वर्षात शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्समध्येही(WhatsApp Stickers) अपडेट आले आहेत. दिवाळीपासून सोशल मीडियामध्ये धूमाकूळ घालणारी व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स प्रत्येक सणवारांनिमित्त, खास दिनाचं औचित्य साधून युजर्सना अनेक पर्याय खुली करून देत असते. मग आज दिवशीच पहा नव्या वर्षात तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सवर कोणकोणते पर्याय आहेत?

WhatsApp वर नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी काय पर्याय ?

व्हॉट्सअ‍ॅप वर थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही अनेक स्टिकर्स डाऊनलोड करू शकता. केवळ ती स्टिकर्स डाऊनलोड करून तुम्हांला व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅड करावी लागतात. मग थेट व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने तुम्ही शेअर करू शकता. Happy New Year 2019: नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Messages, Status, GIF Images, Animated Stickers

Inno Studio Apps द्वारा कशी शेअर कराल स्टिकर्स ?

व्हॉट्सअ‍ॅपद्वारा नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी Inno Studio Apps चा वापर करता येऊ शकतो. याकरिता तुम्हांला पॅक डाऊनलोड करून तो व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अ‍ॅड करणंदेखील आवश्यक आहे. WhatsApp Stickers Update : '8' सोप्या स्टेप्समध्ये कोणताही फोटो बनू शकेल आता Sticker

New Year 2019 Android Stickers मोफत कशी डाऊनलोड कराल ?

1. सर्वात प्रथम तुमच्याकडे व्हॉट्सअ‍ॅपचं लेटेस्ट वर्जन असणं आवश्यक आहे. त्यामुळे गूगल प्ले स्टोअरवरून अ‍ॅप अपडेट करून घ्या. त्यानंतर Google Play Store च्या सर्च बॉक्समध्ये ‘New Year Stickers’ असं सर्च करा.

2. ‘New Year Stickers’असं सर्च केल्यानंतर तुम्हांला अनेक पर्याय मिळू शकतात. तुम्हांला आवडेल त्या स्टिकर्स पॅकवर क्लिक करून तो इन्स्टॉल करा.

3.इंस्टॉल केल्यानंतर वापरण्यासाठी त्या पॅकला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अ‍ॅड करणं आवश्यक आहे. याकरिता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पॅक अ‍ॅड करण्यासाठी केवळ '+' बटणावर क्लिक करा.

4.तुमचा स्टिकर्स पॅक अ‍ॅड झाल्यानंतर Emoji आणि GIF tab मध्ये तुम्हांला New Year 2019 Stickers मिळू शकतात.

मग नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा आणि तुमच्या प्रियजनांसोबत, कुटुंबियांसोबत नव्या वर्षाचं स्वागत करा.