India Bans Chinese Mobile Apps: भारत सरकारने घातली TikTok, UC Browser, Shareit सह 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी; जाणून घ्या संपूर्ण यादी

आता भारत सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत, 59 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये टिक टोक (Tik Tok), यूसी ब्राउझर (UC Browser) आणि इतर चिनी अॅप्सचा समावेश आहे.

TikTok logo (Photo Credits: IANS)

गेले काही दिवस चीनच्या वस्तूंवर, गोष्टींवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. आता भारत सरकारने (Government of India) एक महत्वाचा निर्णय घेत, 59 मोबाइल अ‍ॅप्सवर (Mobile Apps) बंदी घातली आहे. यामध्ये टिक टोक (TikTok), यूसी ब्राउझर  (UC Browser) आणि इतर चिनी अॅप्सचा (Chinese Apps) समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. भारताचे सार्वभौमत्व, अखंडता आणि संरक्षण यांसाठी घातक असल्याचे सांगत या अ‍ॅप्सवर बंदी घातली गेली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 A अन्वये, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.

गेले काही दिवस, चिनी अ‍ॅपविरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरू होती, परंतु पहिल्यांदाच सरकारने चिनी कंपन्यांच्या अ‍ॅपवर अधिकृतपणे बंदी घातली आहे. लोकांमध्ये खूप लोकप्रिय असलेल्या शेअर इट, एमआय व्हिडीओ कॉल, विगो व्हिडिओ, ब्युटी प्लस, लाइकी, व्हि मेट, यूसी न्यूज या अ‍ॅप्सवरही सरकारने बंदी घातली आहे.

पहा संपूर्ण लिस्ट –

1. TikTok

2. Shareit

3. Kwai

4. UC Browser

5. Baidu map

6. Shein

7. Clash of Kings

8. DU battery saver

9. Helo

10. Likee

11. YouCam makeup

12. Mi Community

13. CM Browers

14. Virus Cleaner

15. APUS Browser

16. ROMWE

17. Club Factory

18. Newsdog

19. Beutry Plus

20. WeChat

21. UC News

22. QQ Mail

23. Weibo

24. Xender

25. QQ Music

26. QQ Newsfeed

27. Bigo Live

28. SelfieCity

29. Mail Master

30. Parallel Space 31. Mi Video Call – Xiaomi

32. WeSync

33. ES File Explorer

34. Viva Video – QU Video Inc

35. Meitu

36. Vigo Video

37. New Video Status

38. DU Recorder

39. Vault- Hide

40. Cache Cleaner DU App studio

41. DU Cleaner

42. DU Browser

43. Hago Play With New Friends

44. Cam Scanner

45. Clean Master – Cheetah Mobile

46. Wonder Camera

47. Photo Wonder

48. QQ Player

49. We Meet

50. Sweet Selfie

51. Baidu Translate

52. Vmate

53. QQ International

54. QQ Security Center

55. QQ Launcher

56. U Video

57. V fly Status Video

58. Mobile Legends

59. DU Privacy

सरकारच्या वतीने असे म्हटले आहे की, डेटा सुरक्षा आणि 130 कोटी भारतीयांच्या गोपनीयतेच्या संरक्षणाशी संबंधित बाबींबद्दल चिंता वाढली आहे. अलीकडे असे लक्षात आले आहे की, अशा प्रकारच्या चिंतेमुळे आपल्या देशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे.ज्या लोकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप्स आहेत, ते जोपर्यंत मॅन्युअली काढले जात नाहीत तोपर्यंत मोबाईलमध्येच राहतील. मात्र एकदा का हे अ‍ॅप्स प्ले स्टोअरमधून काढल्यानंतर, युजर्स त्यांच्या स्मार्टफोनमधील अॅप्स अपडेट करू शकणार नाहीत. (हेही वाचा: Cyber Attack: या 'Email Id' पासून सावधान! चीन भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत)

दरम्यान, याआधी चीन भारतावर 21 जुनपासून सायबर हल्ला (Cyber Attack) करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आले होते. हा हल्ला इमेलच्या माध्यमातून होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यासाठी चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लान केला आहे, असे या अहवालात म्हटले गेले होते.