Facebook कडून नावात बदल, युजर्सला आता Meta च्या माध्यमातून कनेक्टेड राहता येणार

त्यानुसार कंपनीचे नवे नाव आता मेटा असल्याचे सीईओ मार्क जुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी जाहीर केले आहे.

Facebook | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

सोशल मीडियातील प्रसिद्ध प्लॅटफॉर्म फेसबुकने (Facebook) आपल्या नावात बदल केला आहे. त्यानुसार कंपनीचे नवे नाव आता मेटा असल्याचे सीईओ मार्क जुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासूनच फेसबुकच्या नावात बदल होणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता मार्क जुकरबर्ग यांनी त्याची अधिकृत घोषणा केली आहे.(SMS Scams: सावधान! Google Play Store वरुन गुगलने हटवली 150 Mobile Apps, तुमच्या मोबाईलमध्ये आहेत?)

जुकरबर्ग यांनी कंपनीच्या कनेक्ट वर्चुअल रियलीटी कॉफ्रेन्समध्ये म्हटले की, आम्ही जे काही करतो त्यामध्ये ते सामील करण्यासाठी एक नवा ब्रँन्ड आणण्याची वेळ आली आहे. जुकरबर्ग यांनी असे म्हटले की, आता आम्ही फेसबुक नव्हे तर मेटावर्स होणार आहोत.

जुलै मध्ये अर्निंग कॉलमध्ये जुकरबर्ग यांनी सांगितले होते की, कंपनीचे भविष्य मेटावर्स आहे. फेसबुक जे आमचे लक्ष होते ते एक अल्फाबेट इंक सारखी होल्डिंग कंपनी आहे. जो एका संगठनेअंतर्गत इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ओकुलस आणि मेसेंदर सारख्या काही सोशल नेटवर्किंग अॅप पैकी एक आहे.(Religious Hatred: Facebook वरील कंटेंट मुळे भारतात पसरत आहे धार्मिक द्वेष; खोट्या बातम्या व हिंसाचार पसरवण्यासाठी देखील जबाबदार- Report)

दरम्यान, 18 ऑक्टोंबरला फेसबुकने म्हटले होते की, ते पुढील पाच वर्षात युरोपीयन युनियनमध्ये 10 हजार लोकांना कामावर ठेवणार आहेत. याचा फायदा मेटोवर्स तयार करण्यास होऊ शकतो. मेटावर्स एक नवे ऑनलाईन जग असून येथे लोक शेअर्ड वर्च्युअल स्पेसमध्ये संवाद करतात. फेसबुकने वर्चुअल रियलिटी आणि ऑगमेंटेड रियलिटी मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. तसेच आपल्या जवळजवळ तीन अरब युजर्सला काही डिवाइसेस आणि अॅपच्या माध्यमातून जोडण्याचा विचार आहे.