Facebook and Instagram Removed Fake Accounts: फेसबुक ने जगभरात हजारो बनावट खाती हटविली; इन्स्टाग्रामनेही जवळपास 900 खाती केले डिलिट

ऑक्टोबरमध्ये फेसबुकने खाती, पृष्ठे आणि ग्रूपचे 14 नेटवर्क हटवले. त्यापैकी आठ जणांनी जॉर्जिया, म्यानमार, युक्रेन आणि अझरबैजान या देशांमधील प्रेक्षकांना लक्ष्य केलं होतं.

फेसबुक/इंस्टाग्राम (Photo Credits: File Photo)

Facebook and Instagram Removed Fake Accounts: फेसबुकने 1,196 खाती तर इन्स्टाग्रामवरून 994 दुर्भावनायुक्त खाती तसेच 7,947 बनावट पेज आणि 110 ग्रूप हटवले आहेत. ऑक्टोबरमध्ये फेसबुकने खाती, पृष्ठे आणि ग्रूपचे 14 नेटवर्क हटवले. त्यापैकी आठ जणांनी जॉर्जिया, म्यानमार, युक्रेन आणि अझरबैजान या देशांमधील प्रेक्षकांना लक्ष्य केलं होतं. याशिवाय इराण, इजिप्त, अमेरिका आणि मेक्सिको अशा सहा देशातील नेटवर्कने देशांबाहेरील लोकांवर लक्ष केंद्रित केले. म्यानमारमध्ये 36 फेसबुक खाती, सहा पेज, दोन ग्रूप आणि पीआर एजन्सी ओपनमाईंडशी जोडलेले एक इंस्टाग्राम खाते हटवण्यात आले आहेत. (हेही वाचा - सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी, व्यवहार करताना Bank Frauds चा धोका; या 6 बॅंकिंग आर्थिक फसवणूकीच्या मार्गांबाबत दक्ष रहा!

फेसबुकने सांगितलं आहे की, म्यानमारमध्ये नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी या भागात तपासणीचा एक भाग म्हणून आम्हाला हे नेटवर्क आढळले. सोशल नेटवर्कने म्यानमारमधील लोकांद्वारे चालवलेली 10 फेसबुक खाती, 8 पृष्ठे, 2 ग्रूप आणि 2 इंस्टाग्राम खाती देखील डिलिट करण्यात आली आहेत. हे खाते घरगुती प्रेक्षकांवर लक्ष्य करत होते. (हेही वाचा - Mark Zuckerberg On WhatsApp Pay: 'व्हॉट्सअॅप पे' करिता कंपनी युजर्सकडून शुल्क आकारणार का? मार्क झुकरबर्ग यांनी दिलं 'हे' उत्तर)

अमेरिकेत फेसबुकने 202 फेसबुक खाती, 54 पेज आणि 76 इंस्टाग्राम खाती हटवली आहेत. जी रॅली फोर्ज या अमेरिकन मार्केटींग फर्मशी संबंधित आहेत आणि टर्निंग पॉइंट यूएसए आणि इन्कॉलिव्ह कंझर्वेशन ग्रुपच्या वतीने कार्यरत आहेत. यासंदर्भात फेसबुकने म्हटलं आहे की, "आम्ही गैरवर्तन थांबविण्यासाठी प्रगती करत आहोत. परंतु, आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, हा एक प्रयत्न आहे. आम्ही याबाबत सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहोत."