IPL Auction 2025 Live

Elon Musk ची कंपनी SpaceX त्यांच्या पहिल्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज; 15 सप्टेंबर रोजी सुरु होणार मिशन 'Inspiration 4'

व्हर्जिन गॅलेक्टिक आणि ब्लू ओरिजिनने अनुक्रमे रिचर्ड ब्रॅन्सन आणि जेफ बेझोस यांच्या नेतृत्वाखाली पर्यटकांना अंतराळाचे दर्शन घडवल्यानंतर, आता टेक विश्वातील अब्जाधीश एलोन मस्कची (Elon Musk) कंपनी स्पेसएक्स (SpaceX) त्यांच्या पहिल्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज झाली आहे

Elon Musk (संग्रहित संपादित प्रतिमा)

व्हर्जिन गॅलेक्टिक आणि ब्लू ओरिजिनने अनुक्रमे रिचर्ड ब्रॅन्सन आणि जेफ बेझोस यांच्या नेतृत्वाखाली पर्यटकांना अंतराळाचे दर्शन घडवल्यानंतर, आता टेक विश्वातील अब्जाधीश एलोन मस्कची (Elon Musk) कंपनी स्पेसएक्स (SpaceX)  त्यांच्या पहिल्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. एलोन मस्कची कंपनी स्पेसएक्स 15 सप्टेंबर रोजी आपले पहिले मिशन 'इंस्पिरेशन 4' (Inspiration4) सुरू करणार आहे. अंतराळात उड्डाण करण्याच्या या मिशनमध्ये सामान्य नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये नासाच्या पॅड 39 ए मधून 'इंस्पिरेशन 4' लाँच होईल.

इंस्पिरेशन 4 मिशन टीमने ट्विट केले आहे की, 'इंस्पिरेशन 4’ आणि स्पेसएक्सने अवकाशात जाण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे आणि आता आम्ही आमच्या प्रक्षेपणासाठी पूर्णपणे तयार आहोत. एलोन मस्क हे स्पेसएक्सचे सीईओ आहेत व यावर्षी फेब्रुवारीमध्ये कंपनीने आपल्या अंतराळ मोहिमेची घोषणा केली होती. कंपनीने जाहीर केले होते की, त्यांनी त्यांच्या इंस्पिरेशन 4 या पहिल्या अंतराळ मोहिमेसाठी तयारी सुरू केली आहे. हे चॅरिटी बेज्ड मिशन आहे, ज्याचे नेतृत्व टेक बिझनेसमन Jared Isaacman करणार आहेत, तर इतर तीन लोकही यात सहभागी होतील.

'इंस्पिरेशन 4' स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलच्या सानुकूलित उड्डाण मार्गामध्ये दर दीड तासांनी ग्रहाभोवती फिरेल. तीन दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर, हे ड्रॅगन कॅप्सूल परत येईल आणि फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील समुद्रात उतरेल. या मोहिमेचे नेतृत्व करणारे 37 वर्षीय जेरेड आयझॅकमन ट्रेंड पायलट आहेत. (हेही वाचा: भारताचे मिशन Chandrayaan-2 चे मोठे यश; ऑर्बिटरने लावला चंद्रावरील पाण्याचे रेणू आणि हायड्रॉक्सिलचा शोध)

सेंट ज्यूड चिल्ड्रन्स रिसर्च हॉस्पिटलसाठी दान उभारण्यासाठी आयझॅकमनने हे फ्लाइट खरेदी केले आहे. तसेच, त्यांनी 'इंस्पिरेशन 4' मिशनमध्ये सेंट जूडला दोन जागा दिल्या आहेत आणि मिशननंतर त्यांना 100 दशलक्ष डॉलर्स देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. Issacman यांच्या व्यतिरिक्त क्रूमध्ये Hayley Arcenaux, Chris Sembroski, Sian Proctor यांचा समावेश आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत, मानवी शरीरावर अंतराळाचा कसा परिणाम होतो, हे पाहण्यासाठी प्रयोग केले जातील.