Holi 2021 Stickers: WhatsApp वर 'अशा' पद्धतीने डाउनलोड आणि सेंड करा होळी स्टिकर्स; जाणून घ्या स्टेप्स
व्हॉट्सअॅपवर डीफॉल्टनुसार आपल्याला होळी स्टिकर्स मिळणार नाहीत, म्हणूनचं आपल्याला होळी स्टिकर्स वापरण्यासाठी काही स्टेप्सचा अवलंब करावा लागेल.
Holi 2021 Stickers: व्हॉट्सअॅपवर होळीशी संबंधित स्टिकर्स शेअर केले जातात. सध्या लोक होळीच्या (Holi) उत्सवांनिमित्त एकमेकांना व्हॉट्सअॅप स्टिकर्स (WhatsApp Stickers) पाठवत आहेत. तुम्ही स्वतः हे स्टिकर्स निवडू शकता. व्हॉट्सअॅपवर डीफॉल्टनुसार आपल्याला होळी स्टिकर्स मिळणार नाहीत, म्हणूनचं आपल्याला होळी स्टिकर्स वापरण्यासाठी काही स्टेप्सचा अवलंब करावा लागेल. खालील पद्धतीचा वापर करून तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्स पाठवू शकता.
व्हॉट्सअॅप स्टिकर्स पाठवण्यासाठी स्टेप्स -
- सर्व प्रथम, व्हॉट्सअॅप उघडा आणि त्याच्या स्टिकर्स विभागात जा. येथे इमोजी आयकॉनवर टॅप करा जे डाव्या बाजूला सापडतील. आता स्टिकर चिन्ह देखील येथे दिसेल. (वाचा - Holi 2021 Special Tips: होळी खेळताना स्मार्टफोनमध्ये चुकून पाणी गेल्यास 'या' सोप्या टिप्स ठरतील उपयोगी)
- व्हॉट्सअॅपवर आधीपासूनच उपलब्ध असलेल्या कंपनीचे डीफॉल्ट स्टिकर्स तुम्हाला येथे दिसतील. परंतु आपल्याला येथे + आइकॉनवर टॅप करावे लागेल. All stickers सेक्शनच्या तळाशी स्क्रोल करा आणि तळाशी जा. येथे आपल्याला Get More stickers चा पर्याय दिसेल.
- Get more stickers वर टॅप करताच आपण थेट Google Play Store वर जाल. येथे आपल्याला अनेक प्रकारचे स्टिकर दिसतील. आता येथे सर्च बारमध्ये आपल्याला होळी स्टिकर टॅप करुन लिहावे लागतील. यानंतर, आपण आपल्या आवडीचे स्टिकर निवडू शकता.
- येथे आपण स्टिकर्सचे रेटिंग पाहू शकता आणि त्यानुसार आपण इंस्टॉल करण्याचा पर्याय निवडू शकता. येथून आपण Add to whatsapp ऑप्शनवर क्लिक करू शकता. यानंतर ते आपल्या व्हॉट्सअॅपवर जोडले जातील.
आपण इंपोर्ट केलेले स्टिकर मेनूमध्ये दिसतील. आता आपण स्टिकर मेनूमधील + वर टॅप करून नवीन स्टिकर पॅक पाहण्यास सक्षम असाल. येथे आपण स्टिकर पॅकमधील कोणतेही स्टिकर्स निवडू शकता आणि ते एकमेकांशी शेअर करू शकता.