क्रिकेटर विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीरबाई चानूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2018 जाहीर

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा देशातील सर्वोच्च खेळ पुरस्कार राने गौरवले जाणार विराट आणि मीरबाई

मीराबाई चानू आणि विराट कोहली (संपादित आणि संग्रहीत प्रतिमा)

भारतीय खेळ विश्वात सर्वोच्च समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. PIB ने केलेल्या ट्विटनुसार क्रिकेटर विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीरबाई चानू या दोघांना 2018 सालाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. विराट कोहली आयसीसीच्या रॅकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे तर वेटलिफ्टर मीरबाई चानूने वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये भारताला 22 वर्षांनंतर सुवर्ण पदक मिळावून दिले आहे. यापूर्वी क्रिकेट या खेळात महेंद्र सिंग धोनी आणि सचिन तेंडुलकरला या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

 

25 सप्टेंबर 2018 रोजी राष्ट्रपती भवनात मीरबाई चानू आणि विराट कोहलीला राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासोबतच द्रोणाचार्य अवॉर्ड, अर्जुन अवॉर्ड, ध्यानचंद अवॉर्ड या खेळ क्षेत्रातील इतर मानाचे अवॉर्ड्सही जाहीर करण्यात आले आहेत.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार स्वरूप

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा देशातील सर्वोच्च खेळ पुरस्कार आहे, माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. विशिष्ट खेळात मागील वर्षभरात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूचा या पुरस्काराने गौरव केला जातो. पदक,प्रशस्तीपत्रक आणि 7.5

लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप असते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या

Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)

RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर

Advertisement

RCB vs KKR, IPL 2025 58th Match: जर बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामना रद्द झाला तर केकेआरचे काय होणार? प्लेऑफसाठी हे आहे समीकरण

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement