IPL Auction 2025 Live

एकाच सामन्यात जसप्रीत बुमरहा, इशांत शर्मा , रिषभ पंत यांची विक्रमाला गवसणी

पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवून दुसऱ्या कसोटीतही भारतीय संघाने वेस्ट इंडीजच्या संघाचे कंबारडे कसले आहे. भारतीय संघ दुसरा कसोटी सामना जिंकण्यापासून थोड्याच अंतरावर आहे. महत्वाचे म्हणजे, या सामन्यात भारतीय खेळाडूं जसप्रीस बुमराह (Jasprit Bumraha), इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी विक्रमी झेप घेतली आहे. जसप्रीत बुमराहची हॅट्रिक, इशांत शर्माने कपिल देव यांचे विक्रम मोडले. तसेच युवा खेळाडू रिषभ पंत यानेही महेंद्र सिंह धोनीचे विक्रम मोडले.

Jasprit Bumraha, Ishant Sharma, Rishabh Pant,(Photo: Getty Image)

भारत विरुद्ध वेस्टइंडीज (indiaVsWestIndies) संघात सबिना पार्क (Sabina park),किंग्स्टन येथे दुसरा कसोटी सामना (2nd test) सुरु आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवून दुसऱ्या कसोटीतही भारतीय संघाने वेस्ट इंडीजच्या संघाचे कंबारडे कसले आहे. भारतीय संघ दुसरा कसोटी सामना जिंकण्यापासून थोड्याच अंतरावर आहे. महत्वाचे म्हणजे, या सामन्यात भारतीय खेळाडूं जसप्रीस बुमराह (Jasprit Bumraha), इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी विक्रमी झेप घेतली आहे. जसप्रीत बुमराहची हॅट्रिक, इशांत शर्माने कपिल देव यांचे विक्रम मोडले. तसेच युवा खेळाडू रिषभ पंत यानेही महेंद्र सिंह धोनीचे विक्रम मोडले आहे.

जसप्रीस बुमराह-

भारत विरुद्ध वेस्टइंडीज सामन्यात भारतीय संघातील काही खेळाडूंनी क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले आहे. भारताचा सुपरस्टार गोलंदाज जसप्रीस बुमराह याने मोठा पराक्रम केला आहे. वेस्टइंडीज खेळाडूंना सलग 3 चेंडूवर बाद करुन हॅट्रिक घेतली आहे. भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक टिपणारा तिसरा भारतीय ठरण्याचा मान त्याला मिळाला. पण या मान त्याला विराट कोहलीमुळे मिळाला असून ही हॅटट्रिकदेखील कोहलीचीच आहे, असे एक विधान त्याने दिवसाअखेर केले होते. विराट बुमराहाची अनौपचारिक मुलाखत घेत असताना त्याने हे कबुल केले.

इशांत शर्मा-

भारत विरुद्ध वेस्टइंडीज कसोटी सामन्यात इशांत शर्माने (IShant Sharma) वेस्टइंडीज संघाचा विकेटकिपर बाद करुन विक्रमाला गवसणी घातली. याचबरोबर इंशात शर्माने भारतीय संघाचा माजी खेळाडू कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला आहे. कपिल देव (Kapil dev) यांनी आशिया खंडाबाहेर 155 विकेट्स घेतल्या आहेत. वेस्टइंडीज सामन्या दरम्यान इशांतने 1 विकेट घेवून कपिल देव यांनी आशिया खंडाबाहेर घेतलेल्या 155 विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे. तसेच आशिया खंडाबाहेर सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत इशांत शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. हे देखील वाचा-IND vs WI 2nd Test Day 3: रिषभ पंत याच्याकडून महेंद्र सिंह धोनी याचा Fastest 50 Dismissal विक्रम मोडीत

रिषभ पंत-

भारत विरुद्ध वेस्टइंडीज कसोटी सामन्यात रिषभने यष्टीरक्षक म्हणून मोठा विक्रम नोंदवला आहे. महेंद्र सिंह धोनीने यष्टीमागे राहून 15 कसोटी सामन्यात 50 खेळाडू बाद केले आहेत. मात्र, भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतने धोनीचा हा विक्रम मोडीत काढून केवळ 11 सामन्यात 50 खेळाडू बाद केले आहेरिषभ पंत याने महेंद्र सिंह धोनीचा विक्रम मोडीत काढून ऑस्ट्रेलियाचा यशस्वी यष्टीरक्षक अॅडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. गिलक्रिस्ट यानीही यष्टीमागे राहून 11 सामन्यात 50 खेळाडूंना बाद केले होते. महत्वाचे म्हणजे, गिलक्रिस्ट हा सर्वोकृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो. गिलक्रिस्ट याच्या विक्रमाशी बरोबर करत रिषभ पंतने चांगली कामगिरीचे लक्षणे दाखवले आहेत. रिषभच्या पाठोपाठ जॉनी बेयरेस्टो(Jonny Bairstow), टीम पेन ( Tim Paine), बाउचर (Baucher) यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.