IPL 2019 Live Cricket on Hotstar and Star Sports: इथे पाहू शकाल 'आयपीएल'च्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण

हा सामना तसेच संपूर्ण आयपीएल तुम्ही कुठे व कसे पाहू शकाल याबाबत आम्ही माहिती देणार आहोत

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: IANS)

क्रिकेट विश्वातील एक महत्वाची स्पर्धा ‘आयपीएल’ (IPL) आजपासून सुरु होत आहे. हे आयपीएलचे 12 सिझन असणार आहे. या स्पर्धेमध्ये भारतातील 8 महत्वाच्या शहरांतील 8 संघ सामील होणार आहेत. या व्यावसायिक ट्वेंटी-20 क्रिकेट लीगची स्थापना 2008 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने केली होती, आणि आज याची लोकप्रियता संपूर्ण जगात पोहचली आहे. ‘आयपीएल’च्या या हंगामातील पहिला सामना सन 2018 मधील विजेता चेन्‍नई सुपर किंग्जविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघामध्ये रात्री 8 वाजता सुरू होईल. हा सामना तसेच संपूर्ण आयपीएल तुम्ही कुठे व कसे पाहू शकाल याबाबत आम्ही माहिती देणार आहोत.

आयपीएल 2019 लाईव्ह स्कोअर अपडेट्स आणि पॉइंट्स टेबल - आयपीएलच्या सामन्यातील अगदी प्रत्येक चेंडूचे समालोचन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.

आयपीएल 2019 चे भारतात थेट प्रसारण - स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network) ने आयपीएलच्या सर्व प्रसारणाचे हक्क विकत घेतले आहेत. स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडी या वाहिन्यांवर आयपीएलच्या सामान्यांचे, इंग्रजी सामालोचनासह थेट प्रक्षेपण होणार आहे. स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी (Start Sports 1 Hindi) आणि याच एचडी वाहिनीवर तुम्ही हिंदी समालोचन ऐकू शकता. (हेही वाचा: आयपीएल काऊंटडाऊन सुरु; भारतासह जगभरात कोणत्या TV चॅनल्सवर पाहाल IPL सामने? घ्या जाणून)

हॉटस्टारवर लाईव्ह  स्ट्रिमींग –स्टारने आयपीएल च्या प्रसारणाचे हक्क विकत घेतले असल्याने, हॉटस्टारवर याचे ऑनलाईन लाईव्ह  स्ट्रिमींग होणार आहे. हॉटस्टारचे अॅप आणि वेबसाईटवर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. जिओ वापरकर्त्यांसाठी हॉटस्टार हे पूर्णतः फ्री आहे तर इतर लोकांना यासाठी माफक शुल्क भरावे लागणार आहे