SA 190/9 in 63 Overs| IND vs SA 1st Test Day 5 Live Score Updates: भारत विजयापासून 1 विकेट्स दूर

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आज पहिल्या टेस्ट मॅचच्या अंतिम दिवससचा खेळ खेळण्यात येईल. पाचव्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 9 विकेट्स, तर आफ्रिकेलाअजून 384 धावांची गरज आहे. भारताने पहिल्या कसोटी सामन्यावर पकड मजबूत केली आहे.

06 Oct, 18:37 (IST)

52 व्या रोहित शर्माच्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर डेन पीटने दोन धावा घेत आपले अर्धशतकही पूर्ण केले आहे. पीटचे टेस्टमधील हे पहिले अर्धशतक आहे. 

06 Oct, 18:28 (IST)

भारतीय गोलंदाज सेनूरन मुथुस्वामी-डेन पीट यांची भागीदारी अजून मोडू शकले नाही. भारताला विजयासाठी अजून 2 विकेट्सची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेने आठ गडी राखून 146 धावा केल्या आहेत. सेनूरन 32 आणि पीट 482 धावांवर खेळत आहेत.

06 Oct, 16:41 (IST)

भारत विजयापासून अवघ्या दोन विकेट दूर आहे. आणि लंचपूर्वी टीम इंडिया हा सामना संपवण्याचा प्रयत्न करेल.

06 Oct, 16:26 (IST)

फिलँडरला बाद केल्यावर रवींद्र जडेजाने केशव महाराज यालादेखील लगेच दुसऱ्या चेंडूवर माघारी धाडले. महाराज शून्यावर एलबुडब्लू आऊट झाला. यासह जडेजा आता हॅटट्रिकच्या जवळ येऊन पोहचला आहे. 

06 Oct, 16:22 (IST)

पहिल्या टेस्टमध्ये भारतीय गोलंदाजांनी आपले वर्चस्व राखून ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका देत रवींद्र जडेजा याने एडन मार्करम याला फक्त 39 धावांवर बाद केले. मार्करमला बाद करण्यासाठी जडेजाने शानदार एकहाती झेल टिपला. यानंतर जडेजाने वर्नोन फिलेंडरला एलबीडब्ल्यू बाद केले आणि संघाला सातवी विकेट मिळवून दिली. 

06 Oct, 16:14 (IST)

या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची फलंदाजी कमाल करत आहे. बावुमा, डु प्लेसिसनंतर दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या डावातील शतकवीर क्विंटन डी कॉकला बोल्ड केले. डी कॉकला दुसऱ्या डावात एकही धाव करत आली नाही. 

06 Oct, 15:59 (IST)

मोहम्मद शमी ने भारताला मिळवून दिले सर्वात मोठे यश. कर्णधार फाफ डू प्लेसिस 13 धावा करून बोल्ड झालं. पहिल्या डावात डू प्लेसिसने 55 धावा केल्या होत्या. या विकेटसह टीम इंडियाला विजयासाठी अजून 6 गडी बाद करण्याची गरज आहे. 

06 Oct, 15:52 (IST)

दोन विकेट लवकर गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज क्रीजवर टिकून रहाण्याचा प्रयत्न करीत आहेत. 21 ओव्हरनंतर दक्षिण आफ्रिकेने तीन विकेट्स गमावत 48 धावा केल्या आहेत. एडन मार्करम 26 आणि फाफ डु प्लेसिस9 धावा करत खेळत आहे. भारताला विजयासाठी 7 विकेट्सची गरज आहे. 

06 Oct, 15:23 (IST)

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी सुरू ठेवली आहे. रविचंद्र अश्विननंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने टेंबा बावुमाला बाद केले. बावुमा शून्यावर बाद झाला. यंदाच्या पहिल्या दोन्ही डावात बावुमा चांगले प्रदर्शन करू शकला नाही. 

06 Oct, 15:18 (IST)

भारत दक्षिण दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाला सुरुवात झाली आहे. विजयापासून भारत आता आठ विकेट दूर आहे. दिवसाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये आर अश्विन याने 350 टेस्ट विकेट्स पूर्ण केल्या. अश्विनने थेउनिस डी ब्रुयनला बाद करत सर्वात जलद 350 विकेट्स घेण्याच्या मुथय्या मुरलीधरनच्या रेकॉर्ड ची बरोबरी केली. 


भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात आज पहिल्या टेस्ट मॅचच्या अंतिम दिवससचा खेळ खेळण्यात येईल. चौथ्या दिवशी पूर्ण दिवस फलंदाजी करत टीम इंडियाने विजयासाठी आफ्रिकेला 394 धावांचे लक्ष्य दिले होते. त्यानंतर, चौथ्या दिवसाचा खेळ पूर्ण होईपर्यंत आफ्रिकेने 1 विकेट गमावत 11 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात आफ्रिकेसाठी दुहेरी शतक करणारा डीन एल्गार (Dean Elgar) याला दुसऱ्या डावात फक्त 2 धावा करता आल्या. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने एल्गारला बाद करत संघाला मोठे यास मिळवून दिले. आता, पाचव्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 9 विकेट्स, तर आफ्रिकेलाअजून 384 धावांची गरज आहे. भारताने पहिल्या कसोटी सामन्यावर पकड मजबूत केली आहे.

आजच्या मॅचमध्ये रविचंद्रन अश्विन याच्यावर सर्वांची नजर असणार आहे. आजच्या सामन्यात एक विकेट घेत अश्विन माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड मॉडेल तर दुसरीकडे, मुथय्या मुरलीधरन यांची बरोबरी करू शकतो. आजची एक विकेट अश्विनच्या टेस्ट करिअरमधील सर्वात जलद 350 वी विकेट असणार आहे.

भारताने त्यांचा दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित केला. भारताच्या डावात पुन्हा एकदा रोहित  शर्मा याने शतकी खेळी केली. पहिल्या डावात रोहितने दीडशे धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात तो 127 धावांवर बाद झाला. रोहितने 133 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह आपले दुसरे शतक पूर्ण केले. दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डाव्य़ातील 7 बाद 502 धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकी संघ 431 धावांवर बाद झाला. त्यामुळे, भारताला 71 धावांची आघाडी मिळाली होती. मात्र, दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित आणि मयंक अग्रवाल यांना चांगली सुरुवात करता आली नाही. मयंक केवळ 7 धावा करत माघारी परतला. त्यानंतर रोहितने अर्धशतकी खेळी केली आणि चेतेश्वर पुजारा सह शतकी भागिदारी केली. त्यानंतर, पुजारा 81 धावांवर बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजा याने 40 धावांची आक्रमक खेळी केली. तर कर्णधार विराट कोहली याने नाबाद 31 आणि अजिंक्य रहाणे याने नाबाद 27 धावांची खेळी केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now