IND vs PAK, World Cup 2019 Stats: टॉस जिंका, पहिले Bowling करा; मॅन्चेस्टर सामन्यासाठी चा मंत्र
मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम वर भारत-पाकिस्तान मध्ये खेळाला गेलेला प्रसिद्ध सामना म्हणजे 1999 च्या विश्वचषक स्पर्धेत झालेली लढत.
भारत (India) आणि पाकिस्तानी (Pakistan) संघ मॅन्चेस्टर (Manchester) च्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात (Old Trafford Stadium) एकमेकांशी भिडायला तैयार आहे. मॅन्चेस्टर मधील ओल्ड ट्रॅफोर्ड हे क्रिकेटमधील सर्वात जुने आणि ऐतिहासिक मैदानांपैकी एक आहे. या स्टेडियम वर पहिला सामना इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात 1884 मध्ये झाला होता. त्यापासून या सस्टेडियमवर 47 वनडे सामने खेळले गेले आहेत. या मैदानात भारत-पाकिस्तान मध्ये खेळाला गेलेला प्रसिद्ध सामना म्हणजे 1999 च्या विश्वचषक स्पर्धेत झालेली लढत. या सामन्यात भारताने पाकिस्तानी संघाला 47 धावांनी पराभूत करून विजय मिळविला होता.(IND vs PAK, ICC World Cup 2019: भारत-पाकिस्तान सामन्यावर हि बरसणार वरुण देव? 'हा' आहे हवामान खात्याचा अंदाज)
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा विश्वकप च्या स्पर्धेत एकमेकां समोर येतील. पण त्या आधी, आपण ट्रेंड आणि पॅटर्न्स बघूया जे सामन्याआधी दोन्ही संघाना मदतही करतील शिवाय याचा संघाच्या रचनेवरही प्रभाव पडू शकतात.
टॉस जिंका आणि पहिले गोलंदाजी निवडा
टॉस जिंकणार्या संघांनी आजवर 19 सामने जिंकले आणि 26 गमावले तर एक सामना सोडून दिलेला आहे आणि दुसरा पावसामुळे रद्द केला गेला. त्यामुळे ओल्ड ट्रॅफोर्डच्या मैदानात टॉस जिंकून काही लाभ नाही. टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षण केलेल्या संघांनी या मैदानावर 9 सामने जिंकले आहेत. या मैदानावर दुसरी फलंदाजी करणे हा निश्चितपणे एक फायदा आहे.
भारतीय संघ हा 2018 पासून धावसंख्याचा पाठलाग करून विजयी होणारा एक यशश्वी संघ बनलेला आहे. धाव संख्येचा पाठलाग करत, भारताने 22 पैकी 16 सामने जिंकले आहेत. इंग्लंडमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे डकवर्थ-लुईस (Duckworth-Lewis) नियम लागू पडण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे भारत निश्चितपणे ओल्ड ट्रॅफर्डवर दुसरी फलंदाजी करू पाहील.
फलंदाजांना मुश्किल
ओल्ड ट्रॅफर्डवर प्रथम फलंदाजी सरासरी धावसंख्या 216 आहे. 2010 पासून खेळलेल्या नऊ एकदिवसीय सामन्यात हि संख्या 256 वर गेली आहे. 300 किंवा जास्तीची धाव संख्येचा आकडा संघ फक्त ३ वेळा पार करू शकली आहे. ओल्ड ट्रॅफर्ड येथे बॅटिंगची सरासरी 26.05 इतकी आहे- इंग्लंड मधील कोणत्याही क्रिकेट मैदांतली सर्वात कमी. त्याउलट, ओल्ड ट्रॅफर्डमधील गोलंदाजीची सरासरी केवळ 27.6 9 आहे आणि म्हणून हे मैदान फलंदाजांसाठी सर्वात कठीण ग्राउंड म्हणून ओळखले जाते.
जलद गोलंदाजी चा 'स्वर्ग'
ओल्ड ट्रॅफर्डमध्ये वेगवान गोलंदाजांसाठी गोलंदाजीची सरासरी 29 .37 आहे. त्यामुळे, भारतीय संघ कुलदीप यादव च्या जागी मोहम्मद शमी ला प्लेयिंग इलेव्हन मध्ये स्थान देऊन आपली जलद गोलंदाजी अजून बळकट करु शकतो. पाकिस्तानी संघ हि मोहम्मद अमीर, शाहिन शाह आफ्रिदी, हसन अली आणि वहाब रियाझ या सारख्या अनुभवी गोलंदाजांना निश्चितच संघात घेतील.
भारत-पाकिस्तान संघातील हायवोल्टेज सामना रविवारी 16 जूनला खेळला जाईल. विश्वचकाच्या आजवरच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान सहा वेळा आमने-सामने आले परंतु एकदाही पाकिस्तानी संघ भारतीय संघाला पराभूत करू शकलेला नाही. आपल्या पराभवाचे हेच सत्र सर्फराज अहमद (Sarfraz Ahmed) चा संघ बघू पाहिलं.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)