IND vs PAK, ICC World Cup 2019: सामना समाप्त होण्याआधीही च शाहिद अफ्रिदीने पराभव स्वीकारला, भारताच केल 'अभिनंदन'
भारताचा सलामीवीर के.एल राहुल ने रोहित शर्मासोबत 136 धावांची भागिदारी करून दमदार सुरुवात करून दिली.
भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील विश्वकप सामना अखेर संपुष्टात आला. भारताने आपले जुना विक्रम कायम ठेवत, पाकिस्तानी संघात विश्वकप मध्ये साठव्यांदा पराभवाचा आस्वाद घडवून आणला. मात्र, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) ने तर सामना संपण्याआधीच ट्विट करत पराभवाचा स्वीकार करत भारताचे अभिनंदन केले. (IND vs PAK, ICC World Cup 2019: सामन्यादरम्यान पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद झाला बोअर, जांभया देतानाचे फोटो व्हायरल)
भारताच्या विजयाचं श्रेय बीसीसीआय (BCCI) आणि आयपीएल (IPL) ला देताना देशातील क्रिकेटपटूंमधले गुण हेरून त्यांना योग्य मार्गदर्शन करून संतुलित संघ तयार केल्याचं आफ्रिदीने म्हटलं आहे. आयपीएलमधून गुणी क्रिकेटपटू मिळतात असं नाही तर दबावाखाली कसं खेळायचं हेदेखील समजतं असं आफ्रिदीने ट्विट करत म्हटलं आहे. आफ्रिदीने हे ट्विट पाकिस्तानचे ६ गडी बाद झाल्यावर केलेय.
दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांना हा निर्णय चांगलाच महागात पडला. भारताने 50 षटकांत 336 धावा केल्या. या 'विराट'आव्हानाचा पाठलाग करताना विजय शंकर (Vijay Shankar) ने पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकला बाद करून पहिला धक्का दिला. मात्र, नंतर फखर जमान (Fakhar Zaman) आणि बाबर आझम (Babar Azam) यांनी 104 धावांची भागिदारी केली. कुलदीप यादव ने दोघांना बाद करत दोघांची जोडी तोडली. फखर जमानने 62 धावा केल्या तर बाबर आझम 48 धावांवर बाद झाला.
प्रथम फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर के.एल राहुल (KL Rahul) नं सलामीला येऊन अर्धशतकी खेळी केली. त्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत 136 धावांची भागिदारी करून दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर रोहितने शतक साजरं करत 113 चेंडूत 140 धावा केल्या.