IND vs PAK, ICC CWC 2019: मॅन्चेस्टर सामन्यात राहुल द्रविडचा हा विक्रम मोडण्याची एम एस धोनीला संधी
धोनी हा भारताला विश्व टी-20, 2011 चे आयसीसी विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणारा एकमेव कर्णधार आहे.
पाकिस्तान (Pakistan) ने नाणेफेक जंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संघात शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) जागी विजय शंकर (Vijay Shankar) ची वर्णी लागली आहे. आजचा सामना हा माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) साठी खास आहे. धोनी माजी भारतीय खेळाडू राहुल द्रविड (Rahul Dravid) ला पछाडून भारतासाठी दुसरा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम मोडू शकतो. सध्या धोनी आणि द्रविडने भारतासाठी समान 340 सामने खेळले आहेत. (ICC IND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तान ने टॉस जिंकला, पहिले गोलंदाजी करणार; विजय शंकर चा Debut )
भारतासाठी सर्वाधिक वनडे सामने खेळण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) च्या नवे आहे. सचिनने 461 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. धोनी गेल्या 13 वर्षांपासून भारतीय संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे. धोनी हा भारताला विश्व टी-20, 2011 चे आयसीसी विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणारा एकमेव कर्णधार आहे.
यंदाचा भारत (India)-पाकिस्तान सामना हा विश्वचषक स्पर्धेत या दोन्ही संघामधला सातवा सामना आहे. याआधी, विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ 6 वेळा आमने-सामने आले होते आणि या सामन्यात भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.