IND vs AFG, CWC 2019: विराट कोहली चे अर्ध शतक; रोहित, राहुल झाले अफगाण स्पिंनर्स चे शिकार

विराट ने या आधी ऑस्ट्रेलियाआणि पाकिस्तान विरुद्ध 50 चा आकडा ओलांडला होता.

(Photo Credit: Getty Image)

भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने पुन्हा एकदा दमदार खेळी करत विश्वकप मध्ये आपले तिसरे अर्ध शतक पूर्ण केले आहे. विराट ने या आधी ऑस्ट्रेलिया (Australia) आणि पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध 50 चा आकडा ओलांडला होता. अफगाणिस्तान विरुद्ध खेळताना विराट कोहली व्हा संघ विजयाची चौकार मारण्यास सज्ज आहे. साऊथम्पटन येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारताला पहिल्या 10 ओव्हर मधेच मोठा धक्का सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या रूपात लागला. रोहित ने 10 चेंतूड 1 धावा केल्या. यंदाच्या विश्वकप मध्ये रोहित पहिल्यांदा 50 धावा न करता बाद झाला. (India vs Afghanistan Live Streaming on DD Sports and Prasar Bharti for Free: रेडिओ वर लूटा IND vs AFG एजबस्टन सामन्याचा LIVE आनंद)

रोहित परतल्यावर के एल राहुल (KL Rahul) च्या साथीने डाव सावरत अर्ध-शतकी भागीदारी रचली. मात्र, मोहम्मद नबीच्या चेंडूवर चुकीचा शॉट खेळात राहुल 30 धावा करत बाद झाला. विश्वकप मध्ये पहिल्यांदा स्पिनर ने भारतीय फलंदाजाला बाद केले आहे.

आतापर्यंत विश्वकपमध्ये अपराजित राहून भारताने गुणतक्त्यात आपले पहिल्या चारमध्ये स्थान कायम राखले आहे. तर, अफगाणिस्ताननं आतापर्यंत एकही सामना जिंकल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवत भारतीय संघ गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहचू शकतो.