ICC WTC 2021-23 Points Table: नॉटिंगहम टेस्ट ड्रॉ झाल्यावर जो रूट संघाची ‘बल्ले-बल्ले’, टीम इंडियाला मिळाले इतके गुण
यामुळे यजमान ब्रिटिश संघाची तर बल्ले-बल्ले झाली तर टीम इंडियाचे मोठे नुकसान झाले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याने नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद चक्राची सुरुवात झाली आहे.
ICC WTC 2021-23 Points Table: इंग्लंड (England) आणि भारत (India) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस नॉटिंगहम (Nottingham) येथे पावसाच्या संतत धारेमुळे अखेर रद्द करण्यात आला. भारतीय संघाला पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकण्यासाठी अंतिम दिवशी 157 धावांची गरज होती पण पाचव्या दिवशी पावसाची बॅटिंग सुरु असल्यामुळे एकही चेंडू न खेळता सामना रद्द करावा लागला. यामुळे यजमान ब्रिटिश संघाची तर बल्ले-बल्ले झाली तर टीम इंडियाचे (Team India) मोठे नुकसान झाले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याने नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) चक्राची सुरुवात झाली आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट सिस्टीमनुसार, सामना अनिर्णित झाल्यामुळे आता दोन्ही संघांना प्रत्येकी चार गुण दिले गेले आहेत. (IND vs ENG 1st Test: पहिली नॉटिंगहम कसोटी अनिर्णित; इंग्लंडविरुद्ध भारताच्या विजयात पाऊस बनला खलनायक)
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला सामना 12 गुणांसाठी खेळला गेला होता पण सामना अनिर्णित राहिल्यामुळे आता दोन्ही संघांना 12 गुण दिले गेले आहेत. तसेच पावसामुळे पहिली कसोटी अनिर्णित राहिल्याने पाच सामन्यांची मालिका प्रभावीपणे आता चार सामन्यांची झाली आहे. पतौडी ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील दुसरा सामना 'होम ऑफ क्रिकेट' लॉर्ड्स येथे 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान खेळला जाणार आहे. नॉटिंगहम कसोटी सामन्याच्या सामना चौथ्या दिवशी थांबला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात 14 ओव्हरमध्ये 1 बाद 52 धावा केल्या होत्या. अशास्थितीत अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 157 धावांची, तर इंग्लंडला 9 विकेट्सची गरज होती. मात्र, पाचव्या दिवशी पावसाने सकाळपासून हजेरी लावल्याने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.
दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या नवीन नियमांनुसार दुसऱ्या हंगामात प्रत्येक सामन्यातील विजेत्या संघाला 12 गुण दिले जाणार आहेत. तसेच सामना बरोबरीत राहिल्यास दोन्ही संघांना समान प्रत्येकी सहा गुण, तर सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी चार गुण दिले जातील. पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येक मालिकेत 120 गुण दिले जात होते. तसेच कसोटी मालिका दोन किंवा पाच सामन्यांची आहे याचा विचार केला जात नव्हता. परंतु दुसऱ्या चक्रात प्रत्येक सामन्याला समान गुण दिले जाणार आहेत. प्रत्येक सामन्यातील विजेत्या संघाला १२ गुण मिळतील. संघांनी किती सामन्यांमध्ये किती गुण मिळवले याच्या टक्केवारीनुसार त्यांचे गुणतालिकेतील स्थान ठरणार आहे.