तुमचा आवडता क्रिकेटपटू कोणत्या ब्रँडची जाहिरात करतो?

या कंपन्या आपल्या ब्रँडच्या जाहिरातींमधून या क्रिकेटपटूंची छबी झळकवतात.

भारतात क्रिकेट किती लोकप्रिय आहे, हे आपण जाणताच. त्यामुळे खेळाप्रमाणेच आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला देवत्व दिले जाणे हे काही नवे नाही. हे देवत्व इतके की, या खेळाडूंचे चाहते प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्या आजुबाजूला पहायला मिळतात. या चाहत्यांवर असेला खेळाडूंचा प्रभाव पाहून मग अनेक कंपन्याही त्याचा अपसूकच फायदा करून घेतात. या कंपन्या आपल्या ब्रँडच्या जाहिरातींमधून या क्रिकेटपटूंची छबी झळकवतात. जेनेकरून आपला ब्रँड जनमानसात अधिक घट्ट होईल. पुढे आम्ही काही क्रिकेटपटू आणि ते जाहिरात करत असलेल्या ब्रँडची माहिती देत आहोत. ती वाचून तुम्हीही जाणून घ्या, कोणता तुमचा आवडता क्रिकेटपटू कोणत्या ब्रँडची जाहिरात करतो.

विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हे सध्याचे एकदम चलनी नाणं. केवळ क्रिकेटच नव्हे तर, जगप्रसिद्ध अशा फोर्ब्स मासिकावरही झळकलेलं. विराट कोहली प्यूमा, रॉगन, म्यूवेकॉस्टिक्स, टू यम, टसॉट या ब्रँडसाठी जाहिरात करतो. तसेच, रॉयल चॅलेंज अल्कोहोल, अमेरिकन टूरिस्ट, एमआरएफ टायर्स, उबेर इंडिया, रेमिट 2 इंडिया, फिलिप्स इंडिया आदी ब्रँडसाठीही काम केले आहे.

एमएस धोनी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा एक अत्यंत लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. शक्यतो कोणत्याही वादात न अडकने आणि अत्यंत कूल राहणे हे त्याचे वैशिष्ट्य. अनेक लोकप्रिय कंपन्या धोनीची लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी जीव टाकतात. त्यामुळे धोनीच्या ब्रँडखाली जाहिरात करणाऱ्या कंपन्यांची यादी भली मोठी दिसली तर आश्चर्य वाटायला नको. एमएस धोनी हा सुमाधुरा ग्रुप, इंडिगो पेट्स, नेटमेड्स, ड्रीम 11, स्निकर्स इंडिया, सेवन, गल्फ ऑईल इंडिया आदी ब्रँडची जाहिरात करतो.

रोहित शर्मा

अत्यंत प्रतिभावंत असा हा खेळाडू. त्याच्या खेळावर चाहते प्रचंड प्रेम करतात. पण, क्रिकेटच्या जाणकारांकडूनही शर्माचे नेहमी कौतुक केले जाते. त्यामुळे अनेक नामवंत कंपन्या रोहितला घेऊन आपला ब्रँड ठळकपणे ठसवायचा प्रयत्न करतात. रोहित शर्मा शार्प टीव्हीची जाहिरात करतो. यापूर्वीही तो अनेक छोट्या मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमधून झळकला आहे.

शिखर धवन

बिग बजार, कॉर्नरस्टोन स्पोर्ट सारख्या नामवंत ब्रँडच्या जाहिरातींमधून झळकलेला शिखर धवन आता एमआरएफसाठी जाहिरात करतो.

जसप्रीत बुमराह

आपल्या खास अशा गोलंदाजीमुळे मैदानावर चर्चेत राहणाऱ्या बुमराहचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. बुमराहने आजवर अनेक ब्रँडसाठी जाहिरात केली आहे. 'जगल' या पेमेंट आणि ग्रुप डायनिंग कंपनीने गेल्याच वर्षी बुमराहला ब्रँड अँबसरड म्हणून निवडले होते.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Champions Trophy 2025 England Squad: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडने बेन स्टोक्सला संघात का नाही दिले स्थान? कारण आले समोर

SA vs PAK, 3rd ODI Match 2024 Live Toss Update: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग XI

IND W vs WI W 1st ODI 2024 Live Score Update: स्मृती मंधानाच्या 91 धावांच्या जोरावर भारताचे वेस्ट इंडिजसमोर 315 रन्सचे आव्हान, पाहा संपूर्ण स्कोरकार्ड

Ravindra Jadeja Press Conference: हिंदी-इंग्रजीच्या मुद्द्यावरून वाद सुरुच, रविंद्र जाडेजावर ऑस्ट्रेलियन मिडीयाचा गंभीर आरोप

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif