युजवेंद्र चहल याने कतरीना कैफच्या लाईव्ह चॅटमध्ये घेतली एंट्री, पाहा व्हायरल मेसेज

या व्हिडिओ दरम्यान कतरिना फिटनेसविषयी बोलत होती, त्यानंतर चहलने कतरिनासाठी एक मेसेज टाकला आणि हा मेसेज काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

युजवेंद्र चहल, कतरीना कैफ (Photo Credits: IANS and Instagram)

कोरोना व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी भारत करण्यात एकीकडे लॉकडाउन करण्यात आले आहे त्यामुळे सध्या अनेक क्रिकेटपटू सोषसील मीडियावर अधिक सक्रिय झाले आहेत. बरेच क्रिकेटपटू चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्राम व्हिडिओ चॅट किंवा प्रश्न-उत्तरांचा वापर  करीत आहेत. या सर्वांमध्ये एक खेळाडू जो सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो आणि भारतीय चाहत्यांचे मनोरंजन करतो तो टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आहे. चहल टिकटॉक व्हिडिओंच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे सातत्याने मनोरंजन करत आहे एवढेच नव्हे तर आपल्या टिप्पण्यांच्या माध्यमातूनही तो चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कोहली लाईव्ह चॅट करत असताना अनुष्काने एका टिप्पणीने सर्वांचे लक्ष वेधले होते. यंदा चहलने असच काहीसं केलं आहे. (Lockdown: यजुवेंद्र चहल याला सतावतेय एमएस धोनी याची आठवण; अदृश्य होण्याची शक्ती प्राप्त झाल्यास रांचीला जाण्याची इच्छा Watch Video)

बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कैफ इंस्टाग्रामवर लाईव्ह चॅट करत असताना चहलने एंट्री मारली. या व्हिडिओ दरम्यान कतरिना फिटनेसविषयी बोलत होती, त्यानंतर चहलने कतरिनासाठी एक मेसेज टाकला आणि हा मेसेज काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. युजवेंद्रने लिहिले- "हाय, कतरिना मॅम." चहल कतरीनाचा फॅन आहे कतरिनावर त्याचा सेलिब्रिटी क्रश असल्याचे त्याने यापूर्वी उघड केले होते. चहल, भारतीय क्रिकेट संघातील एक सदैव आनंदी व्यक्ती आहे. अलीकडेच भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणाला की चहल जोकरपेक्षा कमी नाही. “जा आणि चहलचा टिकटॉक व्हिडिओ पहा. हा माणूस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तो 29 वर्षांचा आहे. फक्त जा आणि त्याचे व्हिडिओ पहा. तो परिपूर्ण जोकर आहे,” कोहली म्हणाला. पाहा हा व्हायरल मेसेज:

यांची कतरिना कैफच्या लाईव्ह चॅटवर युजवेंद्र चहलची कमेंट

लॉकडाउनच्या या काळात कतरीना सोशल मीडियावर अधिक सक्रिय दिसली आहे. कधी स्वयंपाक करताना, कधी घर साफसफाई करताना ती व्हिडिओ शेअर करत आहे. कतरिनाने वर्कआउटचे व्हिडिओ चाहत्यांसह शेअर केले आहेत. कतरिनाचे फिटनेस व्हिडिओ लॉकडाऊनमध्ये लोकांना प्रवृत्त करतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif