Year Ender 2019: संस्मरणीय ठरला वनडे विश्वचषक, विवादित फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत इंग्लंडने मारली होती बाजी
क्रिकेटचे जनक इंग्लंडने 44 वर्षांत प्रथमच विश्वचषक ट्रॉफी जिंकली. त्यांचा विजय वादातीत असला तरी त्यांचे विश्वविजेते होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. ज्या देशात क्रिकेट नमला त्याला विश्वचषक जिंकण्यासाठी तब्बल 4 दशक लागले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी वर्ष 2019 अनेक प्रकारे विशेष राहिले आहे. यावर्षी जिथे बरेच जुने रेकॉर्ड तुडले तर, काही नवीन रेकॉर्ड बनले सुद्धा. यावर्षी क्रिकेटचा महाकुंभ म्हटलं जाणारा विश्वचषक (World Cup0 देखील खेळला गेला. इंग्लंडमध्ये पाचव्यांदा विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली. भारतीय संघासह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (England) या स्पर्धेच्या सुरूवातीला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार होते, परंतु न्यूझीलंडने (New Zealand) सर्वांना चकित करून अंतिम फेरीत प्रवेश केला. यानंतर काय घडले हे सर्वांना माहित आहे. चला पुन्हा एकदा क्रिकेट विश्वचषकच्या आठवणी आपल्यासमोर आणूया आणि क्रिकेटसाठी हे वर्ष कसे होते हे देखील पाहूया. ज्या देशात क्रिकेट नमला त्याला विश्वचषक जिंकण्यासाठी तब्बल 4 दशक लागले. बर्याच प्रसंगी इंग्लंडचा संघ विश्वचषकचे जेतेपद मिळवण्याच्या जवळ पोहचला होता, पण प्रत्येक वेळी ती ट्रॉफी त्यांच्या हातून घसरली. पण यंदाचे वर्ष इंग्लंडसाठी नशीबवान ठरले. हेच ते वर्ष होते जेव्हा इंग्लंड संघाने वनडे क्रिकेट विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न साकार केले. (रोहित शर्मा याच्यासाठी वर्ष 2019 ठरले खास, वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये केली प्रभावी कामगिरी)
क्रिकेटचे जनक इंग्लंडने 44 वर्षांत प्रथमच विश्वचषक ट्रॉफी जिंकली. त्यांचा विजय वादातीत असला तरी त्यांचे विश्वविजेते होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. 14 जुलैला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याने नाणेफेक जिंकून लॉर्ड्स च्या मैदानावर पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर हेनरी निकोलस आणि टॉम लाथम यांनी केलेल्या शानदार फलंदाजीमुळे संघाने 241 धावांपर्यंत मजल मारली, पण फायनलचा थरार अजूनही बाकी होता. न्यूझीलंडने दिलेल्या स्कोअरचा पाठलाग केला, इंग्लंडने बेन स्टोक्स 84 आणि जोस बटलर 59 धावांच्या जोरावर 241 धावा केल्या आणि सामना टाय झाला. स्कोर बरोबरीत राहिल्याने सुपर-ओव्हर खेळवण्यात आली. विश्वचषक फायनलमध्ये सुपर ओव्हर टाकण्याची ही पहिलीच वेळ होती.
पण, सुपर ओव्हर देखील टाय झाली. इंग्लंड आणि न्यूझीलंडने सुपर-ओव्हरमध्ये 15-15 धावा केल्या. सुपर ओव्हर टाय नंतर न्यूझीलंड आणि इंग्लंडमधील आता विजयी संघ घोषित करण्याची वेळ होती. अखेरीस, अधिक चौकारांच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषणा करण्यात आले. इंग्लंडने 24 तर न्यूझीलंडने सामन्यादरम्यान फक्त 16 चौकार मारले. अशाप्रकारे, इंग्लंडने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. मात्र, चौकाराच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्याच्या निर्णयावर जगभरातून टीका करण्यात आली. या निर्णयाबद्दल अनेक खेळाडूंनीही आश्चर्य व्यक्त केला. इंग्लंडला प्रथमच विश्वविजेतेपद जिंकावणाऱ्या कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) याने आपल्या फलंदाजीने मोठा धमाका केला. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात त्याने एकट्याने 17 षटकार लागले आणि विश्वचषकच्या एका डावात सर्वाधिक षटकार लागवण्याचा क्रिस गेल याच्या 16 षटकारांचा रेकॉर्ड मोडला.