Yashasvi Jaiswal And Shubman Gill (Photo Credit- X)

India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघादरम्यान पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जात आहे. यासोबतच टीम इंडिया आणि इंग्लंड संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC WTC) च्या नवीन हंगामाची सुरुवातही केली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने टी-ब्रेक पर्यंत दोन विकेट गमावून 215 धावा केल्या आहे. यशस्वी जयस्वाल 105 तर शुभमन गिल 58 धावांवर खेळत आहे.

इंग्लंडमध्ये यशस्वी जयस्वालचे दमदार शतक

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीयसंघाने चांगली सुरुवात केली. सलामीसाठी आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालने पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर केएल राहुलने  42 धावांवर पहिली विकेट फेकली. लगेचच कसोटी सामन्यात पदार्पण करणारा साई सुदर्शन शुन्यावर बाद झाला. त्यानंतर लंच ब्रेकनंतर कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालने डाव सांभळला. त्यानंतर जयस्वालने 144 चेंडूत शानदार शतक झळकावले. त्याने 144 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकारासह शतक पूर्ण केले. तसेच गिलनेही शानदार खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. तर, इंग्लंडकडून ब्रायडन कार्से आणि बेन स्टोक्सला 1-1 विकेट मिळाली.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर