MI vs RCB IPL 2024 Pitch Report: वानखेडे स्टेडियमवर कोणाला मिळणार मदत, गोलंदाज की फलंदाज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
मुंबईच्या खेळपट्टीवर सर्वात जास्त मदत कोणाला मिळेल, गोलंदाज की फलंदाजाला घ्या जाणून...
MI vs RCB IPL 2024: आयपीएल 2024 चा 25 वा सामना (IPL 2024) 11 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (MI vs RCB) यांच्यात खेळवला जाईल. या सामन्यात दोन्ही संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळतील. मुंबई आपला शेवटचा सामना जिंकून येत आहे तर आरसीबीला त्यांच्या शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबईच्या खेळपट्टीवर सर्वात जास्त मदत कोणाला मिळेल, गोलंदाज की फलंदाजाला घ्या जाणून... (हे देखील वाचा: MI vs RCB Head to Head: वानखेडेवर मुंबई इंडियन्स समोर आरसीबीचे आव्हान, आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व; घ्या जाणून)
वानखेडे स्टेडियम खेळपट्टी अहवाल
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते कारण येथे बरेच चौकार आणि षटकार मारले जातात. सुरुवातीला या मैदानावर वेगवान गोलंदाजांना स्विंग आणि पेस मिळतो, पण चेंडू जुना झाल्यानंतर तो बॅटवर सहज येतो आणि त्यामुळे येथे खूप धावा होतात. या मैदानावर, बहुतेक संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणे पसंत करतात.
दोन्ही संघांचे खेळाडू
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, हार्दिक पंड्या (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा , जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड, क्वेना माफाका.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), यश दयाल, विजयकुमार वैश, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक, कॅमेरॉन ग्रीन, टॉम कुरन, मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान, अनुज रावत.