KKR vs SRH Head to Head: आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा कसा आहे हेड टू हेड रेकाॅर्ड? वाचा एका क्लिकवर

या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. कोलकाता तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, हैदराबाद संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळेल.

KKR vs SRH Head to Head: आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा कसा आहे हेड टू हेड रेकाॅर्ड? वाचा एका क्लिकवर
KKR vs SRH (Photo Credit - X)

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 15 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात ईडन गार्डन्स, कोलकाता (Eden Gardens, Kolkata) येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या हंगामात, कोलकाताचे नेतृत्व अजिंक्य राहणे करत आहे. तर, हैदराबादची कमान पॅट कॅमिन्सच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. कोलकाता तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, हैदराबाद संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळेल.

हेड टू हेड रेकाॅर्ड (KKR vs SRH Head To Head)

आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एकूण 28 सामने खेळले गेले आहेत. या काळात, कोलकाता नाईट रायडर्सने वरचढ कामगिरी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 19 सामने जिंकले आहेत. तर, सनरायझर्स हैदराबादने फक्त नऊ सामने जिंकले आहेत. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये तीन सामने खेळले गेले. कोलकाता नाईट रायडर्सने तिन्ही सामने जिंकले होते. सनरायझर्स हैदराबाद संघाने 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शेवटचा विजय नोंदवला होता. यावेळी सनरायझर्स हैदराबाद पुनरागमन करू इच्छिते.

हे देखील वाचा: KKR vs SRH IPL 2025 15th Match Live Streaming: आज कोलकाता आणि हैदराबादमध्ये होणार अटीतटीची लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स- सुनील नरेन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे, अंगकृष्ण रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मोईन अली, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

प्रभावशाली खेळाडू - वैभव अरोरा

सनरायझर्स हैदराबाद - अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि झीशान अन्सारी

प्रभावशाली खेळाडू - अ‍ॅडम झांपा

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2025 04:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).