Gautam Gambhir Speaks on Yashasvi Jaiswal: ‘आमची सवय आहे ओव्हरहायप करण्याची…’ यशस्वी जैस्वालबद्दल गौतम गंभीर का असे म्हणाला? (Watch Video)
त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक आणि पहिले द्विशतक होते. जगभरात सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत पण नेहमीप्रमाणे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे (Gautam Gambhir) मत वेगळे आहे.
IND vs ENG 2nd Test: भारतीय संघाची उगवती स्टार यशस्वी जैस्वालची (Yashasvi Jaiswal) बॅट आजकाल कमालीची कामगिरी करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीत त्याने 209 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक आणि पहिले द्विशतक होते. जगभरात सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत पण नेहमीप्रमाणे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे (Gautam Gambhir) मत वेगळे आहे. पीटीआयशी बोलताना गंभीर म्हणाला की, भारतात खेळाडू खूप लवकर ओव्हरहायड होतो. यशस्वीबद्दलही तो तेच म्हणाला. यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. (हे देखील वाचा: Rohit Sharma Troll: रोहित शर्माच्या खराब फॉर्मवर उठले प्रश्न, आकडेवारी खूपच खराब; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल)
काय म्हणाला गौतम गंभीर?
गौतम गंभीर म्हणाला, 'मी युवा खेळाडूला त्याच्या यशासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. पण मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की तरुण खेळाडूंना खेळू द्या. आपण मागे पाहिले आहे की भारतात आपल्याला सवय आहे, विशेषत: माध्यमांमध्ये, एखाद्याच्या कर्तृत्वाचा अतिरेक करण्याची. त्यांना वेगवेगळे टॅग देऊन हिरो बनवले जाते.
पाहा व्हिडिओ
गंभीर पुढे म्हणाला की, 'यामुळे खेळाडूंकडून अपेक्षा वाढतात आणि त्यांच्यावर दबाव वाढतो. त्यामुळे खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळ करता येत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या खेळाचा आनंद लुटू द्या.'' गंभीरचे हे विधान काही प्रमाणात योग्यही आहे. कारण शुभमन गिलचे खूप कौतुक झाले पण सध्या तो टीकेचा शिकार होत आहे. मात्र गंभीरने त्याचा बचावही केला.
गिल आणि अय्यर यांनी केला बचाव
यशस्वी जैस्वालचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर सातत्याने टीकेचे शिकार होत आहेत. विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावातही दोघे फ्लॉप ठरले. मात्र गौतम गंभीरने या दोघांचा बचाव केला आहे. याबाबत तो म्हणाला, 'आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. ते दर्जेदार खेळाडू आहेत. या दोघांनी चांगली कामगिरी केली आहे आणि त्यामुळेच ते संघासोबत आहेत.