IND Vs ENG: कर्णधार विराट कोहलीचा तडाखा; सौरव गांगुलीच्या विक्रमाशी केली बरोबरी
इंग्लंडने ठेवलेल्या 420 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा 192 रनवर ऑल आऊट झाला. याचबरोबर 4 कसोटी सामन्याच्या मालिकेत इंग्लंडच्या संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
India Vs England: इंग्लंडरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 227 धावांनी पराभव झाला आहे. इंग्लंडने ठेवलेल्या 420 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा 192 रनवर ऑल आऊट झाला. याचबरोबर 4 कसोटी सामन्याच्या मालिकेत इंग्लंडच्या संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, या सामन्यात 76 धावा करून भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) माजी खेळाडू सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारतीय संघासाठी 50 पेक्षा अधिक धावा करणारा विराट कोहली आठवा खेळाडू ठरला आहे. त्याने 51 वेळा ही कामगिरी करून दाखवली आहे. यात 24 अर्धशतक आणि 27 शतकांचा समावेश आहे.
विराट कोहली आता लवकरच दिलीप वेंगसरकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचे विक्रम मोडण्याची शक्यता आहे. भारतासाठी दिलीप वेंगसरकर 53 तर, वीरेंद्र सेहवान यांनी 50 धावा केल्या आहेत. या 134यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर अव्वल स्थानी आहेत. तर, राहुल ड्रव्हिड दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सचिन तेंडूलकर यांनी 200 कसोटी सामन्यात 119 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यानंतर राहुल ड्रविड 99 (164 डाव), सुनिल गावस्कर 79 (125 सामने), व्ही.व्ही. एस लक्ष्मण 73 (134), सौरव गांगुली 51 (113 सामने). हे देखील वाचा- IND vs ENG 1st Test 2021: विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या पराभवाचा चौकार, चेन्नई टेस्ट पराभवासाठी दिलं हे कारण
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभवाला सामोरे जावा लागले आहे. भारतीय जमिनीवरचा इंग्लंडचा हा सगळ्यात मोठा विजय आहे. तर, चेन्नईच्या मैदानात 22 वर्षानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ पराभूत झाले आहे. या विजयासोबतच इंग्लंडचा संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेतही पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, भारतीय संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. सध्या दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड आणि तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे.