Virat Kohli Milestone: अंतिम सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास, धवनचा मोठा विक्रम मोडला

अंतिम सामन्यात मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा असलेल्या विराट कोहलीने 35 चेंडूत 43 धावांची खेळी खेळल्यानंतर आपली विकेट गमावली. तथापि, या खेळीच्या जोरावर कोहलीने आयपीएलच्या इतिहासात एक मोठा विक्रम केला ज्यामध्ये त्याने शिखर धवनला मागे टाकले.

Virat Kohli Milestone: अंतिम सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास, धवनचा मोठा विक्रम मोडला
Virat Kohli (Photo Credit- X

Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings IPL 2025 Final: आयपीएल 2025च्या हंगामातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने पंजाबसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अंतिम सामन्यात मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा असलेल्या विराट कोहलीने 35 चेंडूत 43 धावांची खेळी खेळल्यानंतर आपली विकेट गमावली. तथापि, या खेळीच्या जोरावर कोहलीने आयपीएलच्या इतिहासात एक मोठा विक्रम केला ज्यामध्ये त्याने शिखर धवनला मागे टाकले. (हे देखील वाचा: IPL 2025 Prize Money: आयपीएल विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, उपविजेता आणि प्लेऑफ पात्रता संघाला मिळणार इतकी बक्षीस रक्कम)

कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा खेळाडू बनला

विराट कोहली आता आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात कोहलीने 43 धावांच्या खेळीदरम्यान एकूण तीन चौकार मारले. यासह, आता आयपीएलच्या इतिहासात कोहलीच्या नावावर एकूण 771 चौकारांची नोंद झाली आहे. कोहलीच्या आधी नंबर-1 स्थानावर असलेल्या शिखर धवनच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात एकूण 768 चौकार मारण्याचा विक्रम होता. विराट कोहलीने आयपीएल कारकिर्दीतील त्याच्या 267 व्या सामन्यात हा टप्पा गाठला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे खेळाडू

विराट कोहली - 771 चौकार

शिखर धवन - 768 चौकार

डेव्हिड वॉर्नर - 663 चौकार

रोहित शर्मा - 640 चौकार

अजिंक्य रहाणे - 514 चौकार

विराट कोहलीने स्वतःचाच विक्रम मोडला

आयपीएलच्या इतिहासात संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा स्वतःचाच विक्रम मोडला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध एकूण 1146 धावा करणाऱ्या कोहलीने आता हा आकडा ओलांडला आहे आणि पंजाब किंग्जविरुद्ध आयपीएलमध्ये एकूण 1159 धावा केल्या आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).