IPL 2025 Prize Money: आयपीएल विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, उपविजेता आणि प्लेऑफ पात्रता संघाला मिळणार इतकी बक्षीस रक्कम
क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करून पंजाब किंग्जने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. या हंगामात आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार (Rahat Patidar) करत आहे. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) खांद्यावर आहे.
Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings IPL 2025 Final: आयपीएल 2025 चा अंतिम सामना (IPl 2025) आज म्हणजेच 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) खेळला जाईल. क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करून पंजाब किंग्जने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. या हंगामात आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार (Rahat Patidar) करत आहे. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) खांद्यावर आहे.
दरम्यान, आयपीएल हा फक्त क्रिकेटचा खेळ नाही तर तो मोठ्या पैशांचा एक व्यासपीठ बनला आहे. दरवर्षी विजेत्या संघाला मोठी बक्षीस रक्कम दिली जाते. आयपीएल 2025 मध्येही बीसीसीआयने बक्षीस रक्कम कायम ठेवली आहे. (हे देखील वाचा: RCB vs PBKS, TATA IPL 2025 Final Stats: आयपीएलच्या इतिहासात बंगळुरू विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी, दोन्ही संघाच्या आकेडवारीवर एक नजर)
विजेता संघ: 20 कोटी रुपये
उपविजेता संघ: 13 कोटी रुपये
एलिमिनेटरमध्ये पराभूत संघ (तिसरे स्थान): 7 कोटी रुपये
चौथे स्थान मिळवणारा संघ: 6.5 कोटी रुपये
ही तीच बक्षीस रक्कम आहे जी आयपीएल 2024 मध्ये देखील लागू होती, जेव्हा कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ने विजेतेपद जिंकले आणि 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली आणि सनरायझर्स हैदराबाद उपविजेता संघ होता.
खेळाडू आणि सपोर्ट स्टाफलाही वाटा मिळेल
विजेत्या संघाची बक्षीस रक्कम केवळ फ्रँचायझी मालकांपुरती मर्यादित नाही. अनेकदा असे दिसून येते की ही रक्कम खेळाडू, कोचिंग स्टाफ आणि इतर सहयोगींमध्ये देखील वाटली जाते. अशा परिस्थितीत, अंतिम फेरीत जिंकणाऱ्या संघाच्या खेळाडूंना वैयक्तिकरित्या मोठी रक्कम मिळू शकते. बीसीसीआय व्यतिरिक्त, टायटल स्पॉन्सर्स, ब्रॉडकास्टिंग पार्टनर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म आयपीएलच्या बक्षीस रकमेत महत्त्वपूर्ण योगदान देतात. यामुळे, बीसीसीआय दरवर्षी संघांना इतकी मोठी बक्षीस रक्कम देण्यास सक्षम आहे. आयपीएलच्या महसूल मॉडेलमुळे ही लीग जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग बनते.
अंतिम सामना: कोहली विरुद्ध अय्यर
आरसीबीसाठी, हा सामना विराट कोहलीच्या कारकिर्दीतील सर्वात खास रात्र बनू शकतो. तो 2008 पासून या फ्रँचायझीचा भाग आहे आणि अद्याप त्याने जेतेपदाची चव चाखलेली नाही. दुसरीकडे, आयपीएल 2024चा चॅम्पियन कर्णधार श्रेयस अय्यरने या हंगामात पीबीकेएसला नवीन दृष्टिकोन आणि आत्मविश्वासाने अंतिम फेरीत नेले आहे. या सामन्यात, कोट्यवधी चाहत्यांच्या नजरा दोन्ही कर्णधारांवर असतील.
(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2025 06:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

