ICC T20I Bowling Ranking: आयसीसी रँकिंगमध्ये वरुण चक्रवर्तीने घेतली मोठी झेप, एकाच वेळी 25 खेळाडूंना सोडले मागे
आयसीसी टी-20 गोलंदाजी क्रमवारीत वरुण चक्रवर्तीनेही (Varun Chakravarthy) बरीच प्रगती केली आहे. त्याने जगातील 25 खेळाडूंना मागे सोडले आहे. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने आयसीसी टी-20 क्रमवारीत 30 व्या क्रमांकावर होता. पण नवीन रँकिंगनंतर तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
ICC Men's T20I Batting Ranking: आयसीसीने आज त्यांची टी-20 नवीन क्रमवारी जाहीर केली. भारतीय खेळाडूंनी आयसीसी टी-20 क्रमवारीतही आपला ठसा उमटवला. हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर तिलक वर्मानेही खूप प्रगती केली आहे. आयसीसी टी-20 गोलंदाजी क्रमवारीत वरुण चक्रवर्तीनेही (Varun Chakravarthy) बरीच प्रगती केली आहे. त्याने जगातील 25 खेळाडूंना मागे सोडले आहे. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने आयसीसी टी-20 क्रमवारीत 30 व्या क्रमांकावर होता. पण नवीन रँकिंगनंतर तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याला 25 स्थानांचा फायदा झाला आहे. चक्रवर्तीने जोफ्रा आर्चर, अर्शदीप सिंग आणि रशीद खान सारख्या स्टार खेळाडूंना मागे टाकले आहे.
ही आहे टॉप 5 ची स्थिती
आदिल रशीद सध्या आयसीसी टी-20 गोलंदाजी क्रमवारीत 718 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजचा गोलंदाज अकील हुसेन 707 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. वानिंदू हसरंगा 698 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. अॅडम झांपा चौथ्या स्थानावर आहे. त्याचे 694 गुण आहेत, तर वरुण चक्रवर्ती 679 गुणांसह पाचव्या स्थानावर आला आहे. (हे देखील वाचा: ICC T20I Batting Ranking: आयसीसी रँकिंगमध्ये मोठा बदल, तिलक वर्माने घेतली 'या' स्थानावर झेप; तर सूर्यकुमार यादवला मोठा धक्का)
तिसऱ्या टी-20 सामन्यात घेतल्या पाच विकेट
इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वरुण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी केली. त्याने इंग्लंडच्या अर्ध्या संघाला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. वरुणच्या सापळ्यात इंग्लंडचे फलंदाज अडचणीत सापडलेले दिसत होते. त्याने 4 षटकांत 24 धावा देत 5 बळी घेतले. याआधी वरुणने दुसऱ्या टी-20 सामन्यातही शानदार गोलंदाजी केली होती. त्याने दुसऱ्या सामन्यात 2 आणि पहिल्या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. वरुणने शानदार कामगिरी केली, ज्यामुळे त्याला आयसीसी टी-20 क्रमवारीत फायदा झाला.
हार्दिक पहिल्या क्रमांकावर तर तिलक दुसऱ्या क्रमांकावर
आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत तिलक वर्मा तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय, हार्दिक पांड्या टी-20 अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.