PBKS vs RCB Head to Head: आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यांत होणार लढत, आकडेवारी कोण आहे वरचढ? घ्या जाणून
त्याला 7 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे ते गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची या मोसमाची सुरुवात खूपच खराब झाली होती. पहिल्या 6 सामन्यात त्याला 5 पराभवांना सामोरे जावे लागले होते.
PBKS vs RCB, IPL 2024: आयपीएल 2024 चा 58 वा (IPL 2024) सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs PBKS) यांच्यात बुधवार, 9 मे रोजी होणार आहे. हा सामना धर्मशाला येथील एचपीसीए क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी आतापर्यंत 11 सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी चार विजय नोंदवले आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना पुढील तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. मात्र आजच्या सामन्यात एक संघ बाद होणार आहे. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी आजचा सामना दोन्ही सघांसाठी खुप महत्तवाचा आहे. (हे देखील वाचा: PBKS vs RCB, IPL 2024 Live Streaming: 'करो किंवा मरो'च्या लढतीत आज बेंगळुरू-पंजाब आमनेसामने, एका क्लिकवर येथे पाहा सामना लाइव्ह)
दोन्ही सघांची हेड टू हेड आकडेवारी
जर आपण पीबीकेएस आणि आरसीबी यांच्यातील हेड टू हेड आकडेवारी पाहिली तर पंजाब किंग्सचा हात वरचा आहे. आयपीएलमध्ये दोन्ही संघ 32 वेळा भिडले आहेत. या कालावधीत पंजाब किंग्जने 17 सामने जिंकले असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 15 सामने जिंकले आहेत. पीबीकेएसने प्रथम फलंदाजी करताना 7 सामने आणि पाठलाग करताना 10 सामने जिंकले आहेत. तसेच, आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 8 आणि लक्ष्याचा पाठलाग करताना 7 सामने जिंकले आहेत. पंजाबने धर्मशाला मैदानावर 12 सामने खेळले आहेत आणि 5 जिंकले आहेत, तर आरसीबीने या मैदानावर 1 सामना खेळला आहे आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
आयपीएल 2024 मध्ये दोन्ही सघांची आतापर्यंतची कामगिरी
पंजाब किंग्जने या मोसमात आतापर्यंत 11 सामने खेळले असून 4 सामने जिंकले आहेत. त्याला 7 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे ते गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची या मोसमाची सुरुवात खूपच खराब झाली होती. पहिल्या 6 सामन्यात त्याला 5 पराभवांना सामोरे जावे लागले होते. पण आरसीबीनेही जोरदार पुनरागमन केले आहे. 11 पैकी 4 सामने जिंकून ते 7व्या स्थानावर आहेत. त्याने मागील तीनही सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत आरसीबी सध्या चांगल्या लयीत आहे.