M Chinnaswamy Stadium, Bengaluru T20 Records: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार चुरशीची लढत, जाणून घ्या कशी आहे एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी आणि टी-20 रेकॉर्ड

आता या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना उद्या म्हणजेच 3 डिसेंबरला बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. तिसरा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. पण टीम इंडियाने चौथ्या टी-20 सामन्यात शानदार पुनरागमन केले. आता टीम इंडियाच्या नजरा विजयासह मालिका पूर्ण करण्यावर असतील.

IND vs SA (Photo Credit - Twitter)

IND vs AUS 5th T20I: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी खेळवण्यात आला. दोन्ही संघांमधील हा सामना शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव करत मालिका ताब्यात घेतली. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना उद्या म्हणजेच 3 डिसेंबरला बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. तिसरा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. पण टीम इंडियाने चौथ्या टी-20 सामन्यात शानदार पुनरागमन केले. आता टीम इंडियाच्या नजरा विजयासह मालिका पूर्ण करण्यावर असतील. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाला परतीच्या मार्गावर आणखी एक सामना जिंकण्याची इच्छा आहे.

शेवटचा टी-20 सामना कधी आणि कुठे खेळला जाणार?

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे. इथे एक छोटी बाउंड्री आहे आणि विकेटही सपाट आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना आणखी एक उच्च स्कोअरिंग सामना पाहायला मिळू शकतो.

एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील आकडेवारी

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आतापर्यंत 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या मैदानावर सरासरी 139 धावा आहेत. त्याच वेळी, या 8 सामन्यांमध्ये, केवळ 2 वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे आणि 5 सामने पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. अशा स्थितीत उद्याच्या सामन्यात नाणेफेकही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS 5th T20: ऋतुराज गायकवाडला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, विराटला टाकू शकतो मागे!)

टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग., प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार, दीपर चहर.

ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, टीम डेव्हिड, बेन ड्वार्शुईस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

Aaron Hardy ADAM ZAMPA Akshar Patel Arshdeep Singh Australia Avesh Khan Glenn Maxwell India India vs Australia India vs Australia T20 Series 2023 Ishan Kishan Jason Behrendorff Jitesh Sharma Josh Inglis Kane Richardson Marcus Stoinis Matt Short Matthew Wade Mukesh Kumar Nathan Ellis Prasidh Krishna Ravi Bishnoi Rinku Singh Rituraj Gaikwad Sean Abbott Shivam Dubey Shreyas Iyer Steve Smith SURYAKUMAR YADAV T20 Series Tanvir Sangha Tilak Verma Tim David Travis Head Washington Sundar Yashasvi Jaiswal अक्षर पटेल अर्शदीप सिंग अ‍ॅडम झाम्पा अॅरॉन हार्डी आवेश खान इशान किशन ऋतुराज गायकवाड ऑस्ट्रेलिया केन रिचर्डसन ग्लेन मॅक्सवेल जितेश शर्मा जेसन बेहरेनडॉर्फ जोश इंग्लिस टिम डेव्हिड टिळक वर्मा टी-20 मालिका ट्रॅव्हिस हेड तन्वीर संघा नॅथन एलिस प्रसीध कृष्णा भारत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मार्कस स्टॉइनिस मुकेश कुमार मॅट शॉर्ट मॅथ्यू वेड यशस्वी जैस्वाल रवी बिश्नोई रिंकू सिंग वॉशिंग्टन सुंदर शिवम दुबे शॉन अॅबॉट श्रेयस अय्यर सूर्यकुमार यादव स्टीव्ह स्मिथ


Share Now