AUS vs SL 1st Test 2025 Day 1 Stumps Scorecard: पहिला दिवस कांगारुच्या नावावर, ऑस्ट्रेलियाने दोन विकेट गमावून केल्या 330 धावा, उस्मान ख्वाजा आणि स्टीव्हन स्मिथचे शानदार शतक
पहिल्या दिवसाचा खेळ संपला. पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर ऑस्ट्रेलियन संघाने 81.1 षटकांत दोन विकेट गमावून 330 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Sri Lanka National Cricket Team vs Australia Men's Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया मेन्स क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवापासून गॅले येथील गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत श्रीलंकेची कमान धनंजय डी सिल्वाच्या हातात आहे. तर, ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडे आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला. पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर ऑस्ट्रेलियन संघाने 81.1 षटकांत दोन विकेट गमावून 330 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात प्रथम फलंदाजी केली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली.
उस्मान ख्वाजा आणि स्मिथचे दमदार शतक
ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाने शानदार शतकासह सर्वाधिक 147 धावा केल्या. उस्मान ख्वाजा व्यतिरिक्त कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाबाद 104 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त, ट्रॅव्हिस हेडने 57 आणि मार्नस लाबुशेनने 20 धावा केल्या. (हे देखील वाचा: Steve Smith 10000 Test Runs: स्टीव्ह स्मिथने रचला एक खास विक्रम, सचिन-गावस्कर सारख्या दिग्गजांच्या क्लबमध्ये मिळाली एन्ट्री)
श्रीलंकेची अवस्था वाईट
दुसरीकडे, प्रभात जयसूर्याने श्रीलंकेच्या संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्या आणि जेफ्री वँडरसे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. आता दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा संघ सामन्यात पुनरागमन करेल की ऑस्ट्रेलियन फलंदाज स्कोअरबोर्डवर आणखी मोठी धावसंख्या उभी करतील हे पाहणे रंजक ठरणार आहे.