IND vs SA 3rd T20I Live Streaming Online: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने टीम इंडिया उतरणार मैदानात; कधी, कुठे पाहणार सामना?
एक मोठा निर्णय घेत संघाने स्टार फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल यांना विश्वचषकासाठी रवाना होण्यापूर्वी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
इंदूरमध्ये होणारा तिसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. भारताने T20 मालिकेतील पहिला सामना 8 विकेटने जिंकला, दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने कडवी झुंज दिली आणि अखेरच्या षटकात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. सलग दोन सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने मालिका जिंकली. भारताने घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत आफ्रिकेचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एक मोठा निर्णय घेत संघाने स्टार फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल यांना विश्वचषकासाठी रवाना होण्यापूर्वी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. बड्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारला पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. श्रेयस अय्यरलाही संधी मिळू शकते. या सामन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या माहितीवर एक नजर टाकूया...
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20 सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20I सामना मंगळवार 4 ऑक्टोबर रोजी इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20 सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल, तर या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20I सामना तुम्ही कुठे आणि कसा पाहू शकता?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनेलवर तुम्ही भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20 सामना थेट प्रक्षेपण पाहू शकता, जिथे विविध भाषांमध्ये समालोचन ऐकले जाईल. हा सामना भारतीय संघाचा देशांतर्गत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे, त्यामुळे तुम्ही त्याचे प्रसारण DD Sports वर देखील पाहू शकाल. (हे देखील वाचा: Jasprit Bumrah: दुखापतीमुळे ICC T20 विश्वचषकातून जसप्रीत बुमराह बाहेर, स्पर्धेतून बाहेर गेल्यावरही ट्वीट करत का मानले आभार?)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20I सामना मी लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?
तुम्हाला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20I सामना तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेट किंवा स्मार्ट टीव्हीवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहायचा असेल तर तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकता. त्याच वेळी, जर तुम्हाला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 सामना लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर पाहायचा असेल, तर तुम्ही Hotstar च्या वेबसाइटवर ऑनलाइन स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.