ICC Ranking: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाला मोठा फटका; आयसीसी क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर घसरला

बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 असा पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघाचे आयसीसी क्रमवारीत मोठे नुकसान झाले आहे.

Team India (Photo Credit - X)

ICC Rankings India Test: टीम इंडियाला बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाकडून 3-1 ने निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे कसोटी क्रमवारीत संघाचे मोठे नुकसान झाले आहे. भारत (IND)आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा (AUS)संघ आहे. 126 गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ पहिला आहे. त्याचवेळी, पाकिस्तानविरुद्धच्या(PAK) कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने (SA)दुसरे स्थान काबीज केले आहे. 112 गुणांसह दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारत 109 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. त्यात आता वाढ झाली आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 3-1 असा पराभव दक्षिण आफ्रिकेसाठी फायदेशीर ठरला. दुसरीकडे पाकिस्तानविरुद्ध 2-0 असा विजय यामुळे दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर येण्यात यशस्वी ठरला. इंग्लंड सध्या 106 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. क्रमवारीतील गुणांच्या बाबतीत न्यूझीलंड आणि इतर संघ अव्वल-5 पासून खूप दूर आहेत. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी कसोटी क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे.

भारत पहिल्यांदाच अंतिम फेरीत नाही

2021 मध्ये पहिल्यांदा जेव्हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला गेला. तेव्हा भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला. तेव्हा न्यूझीलंडने 8 विकेट्सने विजय मिळवून ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने दोन वर्षांनंतर 2023 च्या फायनलमध्येही प्रवेश केला होता. पण यावेळी ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता ही पहिलीच वेळ आहे की भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळणार नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement