INDW vs ENGW, 1st T20I Match 2025 Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला दिले 211 धावांचे लक्ष्य, स्मृती मानधनाने झळकावले शानदार शतक
या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व नॅट सायव्हर-ब्रंट करणार आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडसमोर 211 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
England Women National Cricket Team vs India Women National Cricket Team: इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 28 जून रोजी नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व नॅट सायव्हर-ब्रंट करणार आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडसमोर 211 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. (हे देखील वाचा: IND W vs ENG W 1st T20I: टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडिया झाली खास क्लबची सदस्य, आतापर्यंत फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियालाच मिळाला होता हा मान)
या रोमांचक सामन्यात इंग्लंडच्या कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर, टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी उतरली आणि त्यांची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 77 धावा केल्या.
त्यानंतर, टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत पाच विकेट गमावून 210 धावा केल्या. टीम इंडियासाठी स्मृती मानधनाने 112 धावांची सर्वोत्तम खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान स्मृती मानधनाने 62 चेंडूत 15 चौकार आणि तीन षटकार ठोकले. स्मृती मानधनासह हरलीन देओलने 43 धावा केल्या.
दुसरीकडे, एम अर्लॉटने इंग्लंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. इंग्लंडसाठी लॉरेन बेलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. लॉरेन बेलशिवाय एम अर्लॉट आणि सोफी एक्लेस्टोनने प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला 20 षटकांत 211 धावा करायच्या आहेत. दोन्ही संघांना हा सामना जिंकून मालिकेत आघाडी मिळवायची आहे.