T20 World Cup 2021: भारतात IPL वरून गोंधळ, पण न्यूझीलंडचा कर्णधार म्हणाला – ‘आम्हाला WC मध्ये त्याचा फायदा झाला’

आयसीसी टी-20 विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकला नसल्याचा आरोप आयपीएलवर वारंवार होत आहे. याबाबत भारतात खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनने वर्ल्ड कपपूर्वी आयपीएल खेळणे खूप फायदेशीर असल्याचे म्हटले आहे. न्यूझीलंडने 4 पैकी 4 जिंकून आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.

केन विल्यमसन (Photo Credit: IANS)

आयसीसी टी-20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतीय संघ (Indian Team) उपांत्य फेरीत पोहोचू शकला नसल्याचा आरोप आयपीएलवर (IPL) वारंवार होत आहे. याबाबत भारतात खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) वर्ल्ड कपपूर्वी आयपीएल खेळणे खूप फायदेशीर असल्याचे म्हटले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन म्हणाला की इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 मुळे खेळाडूंना आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2021 पूर्वी संयुक्त अरब अमिराती (यूएई) परिस्थितीबद्दल ज्ञान मिळविण्यात खूप मदत झाली आहे. सलामीच्या सामन्यात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर न्यूझीलंडने 4 पैकी 4 जिंकून आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे आणि ते बुधवार, 10 नोव्हेंबर रोजी इयन मॉर्गनच्या नेतृत्वातील इंग्लंडशी भिडतील. सामन्यापूर्वी केन विल्यमसन म्हणाला की येथे आयपीएलमध्ये खेळणे आणि इतर फ्रँचायझी क्रिकेट खेळणे खूप फायद्याचे होते, ज्यामुळे गोष्टी खूप सोप्या झाल्या. (ENG vs NZ, T20 World Cup Semi-Final: इंग्लंड विरोधात मोठा उलटफेर करण्यासाठी न्यूझीलंड सज्ज, ‘हे’ खेळाडू ठरणार गेमचेंजर)

केन विल्यमसन म्हणाला की, आयपीएलचा दुसरा टप्पा बदलांनी भरलेला होता. यूएईमध्ये वेगळ्या खेळपट्टीवर खेळ करणे खूप फायदेशीर होते. “आयपीएल आणि मी इतर फ्रँचायझी कॉम्प्स समजतो, परंतु निश्चितपणे सर्व देशांतील खेळाडूंच्या ज्ञानात भरपूर भर घालते,” विल्यमसनने सामनापूर्व पत्रकार परिषदेत सांगितले. “आणि शेअर करण्यात सक्षम होण्याचा अनुभव देखील आणि मला वाटते की आम्ही या स्पर्धेत पाहिले आहे व आम्ही निश्चितपणे आयपीएलच्या उत्तरार्धात परिवर्तनशीलता व पृष्ठभाग पाहिले ज्याने कदाचित काही संघांना अधिक नैसर्गिकरित्या दिले. पण तुम्ही वेगवेगळ्या खेळांमध्ये स्पर्धा करता आणि मार्जिन चांगले असतात,” तो म्हणाला. यंदा टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलपर्यंत पोहोचता आलेले नाही. तेव्हापासून आयपीएलबाबत गदारोळ सुरू आहे. भारताचे माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव यांनीही भारतीय संघातील काही खेळाडू आयपीएलला जास्त महत्त्व देतात असा गंभीर आरोप केला होता.

इतकंच नाही तर माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीही असे म्हणाले होते की, जर आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजिनात थोडा अंतर असता तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. टीम इंडियाचे बहुतेक खेळाडू टी-20 विश्वचषकपूर्वी IPL खेळले होते आणि सर्व UAE मध्ये होते. त्यापूर्वीही बहुतेक खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळले होते. लक्षात घेण्यासारखे आहे की न्यूझीलंड व्यतिरिक्त पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या चार संघांनी T20 विश्वचषक उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात तर दुसरा पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळला जाणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now