Syed Mushtaq Ai Trophy 2021 स्पर्धेतून माघार घेणं दीपक हुड्डाला पडलं महागात, BCA ने देशांतर्गत हंगामासाठी केली निलंबनाची कारवाई
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसह भारतात घरेलू क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. पण स्पर्धेच्या सुरुवातीलाच वाद निर्माण झाला जेव्हा बडोदाचा अष्टपैलू दीपक हुड्डाने अचनाक माघार घेतली. आणि आता दीपकला त्याचा निर्णय चांगलाच महागात पडला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनने (BCA) दीपकवर यंदाच्या देशांतर्गत हंगामासाठी निलंबनाची कारवाई केली आहे.
सय्यद मुश्ताक अली (Syed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेसह भारतात घरेलू क्रिकेट (India Domestic Cricket) स्पर्धेला सुरुवात झाली. पण स्पर्धेच्या सुरुवातीलाच वाद निर्माण झाला जेव्हा बडोदाचा अष्टपैलू दीपक हुड्डाने (Deepak Hooda) अचनाक माघार घेतली. आणि आता दीपकला त्याचा निर्णय चांगलाच महागात पडला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनने (Baroda Cricket Association) दीपकवर यंदाच्या देशांतर्गत हंगामासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. दीपकला सत्रात "अनुशासनहीन" आणि "खेळाचा अनादर" केल्याबद्दल निलंबित केले आहे. कर्णधार क्रुणाल पांड्याबरोबर झालेल्या वादानंतर हुड्डा घरगुती टी-20 स्पर्धेपूर्वी माघार घेतली होती. त्याने पांड्यावर "गैरवर्तन" केल्याचा आरोप केला होता. गुरुवारी संध्याकाळी झालेल्या बीसीएच्या (BCA) अॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीत हुड्डा यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीसीए सचिव अजित लेले यांनी पीटीआयला सांगितले की, "बीसीए आणि खेळाचा अनादर केल्याबद्दल आणि त्याला (हुड्डा) या हंगामात निलंबित करण्यात आले आहे. संघ आणि बीसीएला माहिती न देता त्याने संघ आणि (बायो) बबल सोडला." (Syed Mushtaq Ali Trophy 2021: कर्णधार कृणाल पांड्यावर शिवीगाळ करण्याचा आरोप, बडोदाचा हा खेळाडू स्पर्धेतून पडला बाहेर)
सुरुवातीला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी बडोद्याचा उप-कर्णधार म्हणून नियुक्त झालेल्या हुड्डा 9 जानेवारी रोजी बायोबबलमधून बाहेर पडला. त्याने बीसीएला पाठवलेल्या ई-मेलमध्ये पांड्यावर "गैरवर्तन" केल्याचा आरोप केला होता. “या क्षणी मी निराश, औदासिन्य आणि दडपणाखाली आहे,” 46 प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या हुड्डाने ई-मेलमध्ये लिहिले होते. "गेल्या काही दिवसांपासून माझ्या संघाचा कर्णधार कृणाल पांड्या माझ्या सहकाऱ्यांसह आणि रिलायन्स स्टेडियम वडोदरा येथे सहभागी होण्यासाठी आलेल्या इतर राज्य संघांसमोर मला अपशब्द वापरत आहेत." हुड्डाच्या पत्रानंतर बीसीएने व्यवस्थापकाचा अहवाल मागविला होता. "हुडा पुन्हा एकदा 2021-22 हंगामासाठी बडोद्याकडून खेळू शकेल." काही प्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, दीपकबरोबर वाद सुरु असताना क्रृणालने फलंदाजाचं क्रिकेट करीअर संपवून टाकेन, अशी धमकी दिली आहे.
पांड्याने त्याला 'दादागिरी दाखवत' सराव करण्यापासून रोखले असल्याचा बडोद्यासाठी 46 प्रथम श्रेणी आणि 123 टी-20 सामना खेळणार्या हुड्डाने दावा केला होता. हुड्डा तर आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून खेळला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)